सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी साधेपणाने साजरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सचिव विठ्ठल शिवणकर, सहसचिव डॉ.सौ.प्रतिभा गायकवाड, डॉ.शिवलिंग मेनकुदळे, ॲड. दिलावर मुल्ला, डॉ. सौ.भारती पाटील, श्री. शहाजीराव क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते .

कर्मवीर भाऊराव पाटील खऱ्या अर्थाने द्रष्‍टे महापुरुष होते. त्‍यांच्या विचारांची दिशा भविष्‍याचा वेध घेणारी होती. त्‍यांचे शैक्षणिक तत्‍वज्ञान उत्‍तुंग व क्रांतिदर्शी होते. प्रस्‍थापित स्‍वरूपाची शिक्षणपध्दती सोडून त्‍यांनी स्‍वत:ची वेगळी शैक्षणिक तत्‍वप्रणाली निर्माण केली. स्‍वावलंबनाचे बाळकडू देऊन त्‍यांनी आपल्‍या शिक्षणपध्दतीने विद्यार्थ्यांमध्ये व समाजात स्‍वाभिमान व आत्‍मविश्वास आणला, अशा या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो, असे नामदार बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment