मुंबई । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत माहिती देणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली. आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी सांगण्यात आली. आकडेवारीनुसार देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आजही वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासात देशभरात ९९१ कोरोनाची लागण झालेले नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांच्या नोंदीनंतर देशातील करोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ३७८ इतकी झाली आहे. तर कालपासून आजपर्यंत ४३ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.याचबरोबर देशभरात आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात १९९२ रुग्ण हे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
देशातील करोना रुग्णांचा मृत्यू दर ३.३ टक्के इतका आहे. यात वयाच्या विभागणीनुसार वेगगेवळी टक्केवारी समोर आली आहे. ४५ वयापर्यंतच्या रुग्णांचे १४.४ टक्के, ४५ ते ६० वयाच्या रुग्णांचा १०.३ टक्के ६०-७५ वयोगाटातील रुग्णांचा ३३.१ टक्के आणि ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू दर हा ४२.२ टक्के इतका आहे.
1992 people across the country have cured,overall cure percentage is something around 13.85%. Since y’day 991 addl positive cases have been reported which takes confirmed cases to 14,378. 43 new deaths reported in last 24 hrs,taking death toll to 480: Lav Aggarwal,Health Ministry pic.twitter.com/k1fxiqmtns
— ANI (@ANI) April 18, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”