Sindhudurg Boat Accident : सिंधुदुर्गातील वेंगुर्लेत बोट पलटी; 7 खलाशी बुडाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाण्यात जाणाऱ्यांसाठी हा आठवडा धोक्याचा ठरला आहे. २ दिवसांपूर्वी उजनी जलाशयात बोट उलटून 6 प्रवासी गेले तर त्यानंतर नगरमध्ये ४ जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले बंदरात सुद्धा बोट पलटी (Sindhudurg Boat Accident) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असलेली बोट उलटल्याने सात खलाशी बुडाले. यातील तिघांनी पोहून किनारा गाठला तर बाकीच्यांचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं- Sindhudurg Boat Accident

याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.त्याच दरम्यान काल रात्री वेंगुर्ले बंदरात मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना अचानकपणे ती बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर (Sindhudurg Boat Accident) तीन जणांनी पोहत पोहत किनारपट्टी गाठली मात्र बाकीचे ४जण मात्र बेपत्ता झाले. यातील २ जणांचा मृतदेह सापडला तर दोघांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. अचानक घडलेल्या या घटनेनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वाऱ्यामुळे ही बोट भरकटली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले. महत्वाची बाब म्हणजे मागील ३ दिवसात बोट बुडाल्याची हि तिसरी घटना आहे. यापूर्वी उजनी जलाशयात बोट उलटली होती तसेच अहमदनगर SDRF च्या टीमची बोट बुडाल्याने खळबळ उडाली होती. या दोन्ही घटनेत लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, त्यात आता सिंधुदुर्गात सुद्धा बोट पलटी झाल्याने भीतीची वातावरण निर्माण झालं आहे