Sunday, May 28, 2023

सेक्स करणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ काढणे पडले महागात; मिळाली ‘हि’ शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कॅफेमधील लेडिज टॉयलेटमध्ये सेक्स करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ शूट करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. न्यायालयाने त्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्या व्यक्तीचे नाव जोथम ली जिंग असे आहे. हि घटना सिंगापूरमधील होलांडे गावामध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण
होलांडे गावामधील द कॉफी बिन अँड टी लिफ या कॅफेमध्ये मागच्या वर्षी 28 ऑगस्टला ही घटना घडली आहे. या कॅफेमध्ये या जोडप्याने रात्री उशीरापर्यंत बसून पार्टी केली. त्यावेळी ली देखील त्यांच्या शेजारी दारू पित बसला होता. यानंतर ते जोडपे बाथरूमच्या दिशेने गेले. यानंतर ली देखील त्यांच्या मागे गेला. यानंतर हे जोडपे लेडीज टॉयलेटमधील एका बाथरुममध्ये सेक्स करू लागले. सेक्स करत असताना मुलीला दरवाज्याच्या वरून कुणीतरी मोबाईलने सर्व रेकॉर्ड करत असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर त्यांनी सेक्स करायचे थांबवले आणि त्यांनी बाहेर येऊन ली ला पकडले. यानंतर त्यांनी ली कडे त्याचा फोन मागितला मात्र ली ने तो देण्यास नकार दिला. मात्र काही वेळाने त्या जोडप्याने आरडाओरड केल्यावर लीने त्यांना फोन दिला. मात्र त्या फोनमध्ये त्यांना रेकॉर्ड झालेला व्हिडीओ भेटला नाही. मात्र पीडित तरुणीला ली ने व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची खात्री असल्याने तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी लीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात न्यायालयाने ली ला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याने जर हा दंड भरला नाही तर त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.