अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गायिका व संगितकार यांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सख्या मावशीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये गायिक असलेली मावशी व संगीतकार काका यांचा समावेश असून एक नातेवाईकाचा मुलगा व चर्चमधील एकाचा समावेश आहे. अत्याचारग्रस्त ही प्रसिध्द गायिकेची मुलगी आहे.

पार्श्वगायिका ही चेन्नईमध्ये सुट्टीसाठी गेली होती. त्यावेळी अल्पवयीन मुलीला सख्या बहिणीच्या घरी ठेवले होते. यावेळी मावशी, काका व नात्यातील एका मुलाने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मावशीने तिला चेन्नईतील किलपौक भागात असलेल्या चर्चमध्ये नेलं. तिथे हेन्री पॉल या पाद्रीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे.

या प्रकाराची माहिती पीडित मुलीने फोन करुन आपल्या आईला दिली. धक्का बसलेल्या पार्श्वगायिकेने ताबडतोब चेन्नई गाठलं. त्यानंतर किलपौकमधील महिला पोलिस स्थानकात तिने चौघा आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पीडिता अल्पवयीन असल्यामुळे पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like