गायिका श्रेया घोषालने केली मुलाच्या नावाची घोषणा; सोशल मीडियावर केली खास पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील सूप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने नुकताच २२ मे २०२१ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. श्रेयाच्या गर्भवती असल्याची बातमी समजल्यानंतर तिच्या चाहत्यांना या बाळाबाबत खूप उत्सुकता लागून होती. अखेर श्रेयाला पुत्ररत्न झाल्याची माहिती तिने स्वतःच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसह शेअर केली होती. यानंतर बाळाच्या नावाबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या नंतर आज श्रेयाने एक पोस्ट करत आपल्या मुलाचे नाव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. .

https://www.instagram.com/p/CPm_D3TA1H7/?utm_source=ig_web_copy_link

श्रेयाने सोशल मीडियावर आपला पती आणि नवजात बाळासोबतचा एक फोटो शेअर करत, आपल्या मुलाचे नाव देवयान ठेवल्याचे सांगितले आहे. श्रेयाने पोस्ट करत लिहिले आहे की, ‘देवयान मुखोपाध्यायची ओळख करून देत आहे. २२ मेला तो आमच्या आयुष्यात आला आणि आमचं संपूर्ण जगच बदलून गेलं. फक्त आई वडीलचं आपल्या मुलाचा सहवास समजू शकतात. कधीही न संपणारं प्रेम या नात्यात असतं आणि हे सर्व माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे’. असं म्हणत श्रेयाने आपल्या आई झाल्यानंतरच्या मनोभावना आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CPLCt-Ngx_M/?utm_source=ig_web_copy_link

श्रेयाने गर्भवती असल्याची माहितीदेखील सोशल मीडियावर दिली होती. तेव्हापासून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत होता. या काळात श्रेया सतत आपले फोटो आपल्या चाहत्यांसह शेयर करून त्यांना प्रत्येक अपडेट देत होती. श्रेयाचे बेबीशॉवरदेखील फार सुंदर आणि अनोखे झाले होते. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लॉकडाऊन आहे. तसेच कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मनाई आहे. त्यामुळे श्रेयाने बेबी शॉवर ऑनलाईन केले होते आणि ते फोटोसुद्धा चाहत्यांसाठी शेअर केले होते. श्रेयाने २०१५ साली बालपणीचा मित्र शिलादित्य याच्याशी लग्न केले. तो एक सोशल वेबसाईटचा संस्थापक आहे. या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याने यांचे कुटुंबीय अत्यंत आनंदी असल्याचे श्रेयाने सांगितले आहे.

Leave a Comment