सिगारेटच्या सेवनाने पुरुषांचे आयुष्य 17 आणि महिलांचे आयुष्य 22 मिनिटांनी होते कमी; संशोधनात मोठा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीमध्ये अल्कोहोल तसेच सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकतेच या सिगारेटवर एक मोठे संशोधन करण्यात आले. यामध्ये असे आढळून आले आहे की, प्रत्येक पुरुष सिगारेटचे सेवन केल्याने 17 मिनिटे आयुष्य कमी जगतात, तर स्त्रिया या 22 मिनिटांनी त्यांचे आयुष्य कमी जगतात. 2025 सुरू होण्याआधी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मधील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. यामध्ये आरोग्य आणि सामाजिक काळजी विभागातर्फे असे सांगण्यात आले आहे की, जे लोक धूम्रपान करतात, त्यांनी ही सवय लवकरच सोडून द्यावी. धूम्रपान करणाऱ्यांचे आयुष्य निरोगी तर जातच नाही. परंतु त्यासोबत आयुष्यातील काही काळ देखील कमी होतो. तसेच सातत्याने धूम्रपान केल्याने दीर्घ आजार किंवा अपंगत्व येण्याचे संकेत देखील असतात.

या संशोधनात असे आढळून आले आहे की, सिगारेटचे सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सरासरी 20 मिनिटांनी कमी होते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने 20 सिगारेटचे पॅक घेतले तर सुमारे 7 तासांनी त्याचे आयुष्य कमी होते. याचाच अर्थ धूम्रपान करणे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जे लोक आयुष्यभर सिगारेट पीत असतात. ते लोक जवळपास 10 वर्ष कमी जगतात. आपल्याला टीव्ही जाहिरातींमधून देखील धूम्रपानाच्या आपल्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम बद्दल सांगितले जाते परंतु तरीही कुणीही या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

आरोग्य आणि आयुर्मानाचा संपूर्ण लाभ मिळविण्यासाठी, धूम्रपान करणाऱ्यांनी ही सवय पूर्णपणे सोडली पाहिजे, असे अभ्यासात सांगण्यात आले आहे. मागील संशोधनात असे दिसून आले आहे की धूम्रपानाची कोणतीही सुरक्षित पातळी नसून हृदयविकाराचा धोका आणि स्ट्रोकचा धोका दिवसातून 20 वेळा जळणाऱ्या लोकांच्या तुलनेत दिवसातून एक सिगारेट ओढणाऱ्यांसाठी 50 टक्के कमी आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, तंबाखूचा महामारी हा जगाला भेडसावणारा सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्य धोक्यांपैकी एक आहे. यामुळे दरवर्षी 8 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, ज्यात अंदाजे 1.3 दशलक्ष गैर-धूम्रपान करणाऱ्या लोकांचा समावेश आहे जे दुसऱ्या हाताच्या धुराच्या संपर्कात आहेत. जगभरातील 1.3 अब्ज तंबाखू वापरकर्त्यांपैकी सुमारे 80% लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात, जेथे तंबाखूशी संबंधित आजार आणि मृत्यूचे ओझे सर्वात जास्त आहे.