भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ! गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे रुग्ण आढळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा उद्रेक धोकादायक पातळीवर पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे.

यामध्ये ९ लाख १९ हजार १८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ३४ लाख ७१ हजार ७८४ जणांना उपचारानंतर घरी सोडवण्यात आलं आहे. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात दररोज ९० हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या एक हजाराहून अधिक आहे. कोरोनाच्या वेगाने वाढत्या रुग्णांमुळे भारत संक्रमित रुग्णांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलला मागे टाकत भारत आता अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment