Sinhagad Fort : शिवप्रेमींना खुशखबर!! सिंहगड किल्ला 5 जूनपासून पर्यटकांसाठी खुला

Sinhagad Fort
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sinhagad Fort। पुणेकरांसाठी महत्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला सिंहगड किल्ला हा आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी तसेच धोकादायक दरडी काढण्यासाठी २९ मे पासून सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना मनाई होती. मात्र आता हे काम पूर्ण झाले असून येत्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला सिंहगड पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिवप्रेमींना मोठा आनंद झाला आहे.

खरं तर सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. येथे आरसीसी, दगडी बांधकाम करण्यात आले होते. एवढच नव्हे तर पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता होती. यानंतर पुणे वन विभागाने हे अतिक्रमण आणि दरडी हटविण्याचे काम हाती घेतलं. हे काम करत असताना पर्यटकाना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा इजा होऊ नये यासाठी २९ मेपासून पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास मनाई करण्यात आली होती. या काळात वनविभागाने हॉटेल, गडावरील टपरी, घर इत्यादी बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. यावेळी जवळपास २० हजार स्क्वेअर फूट बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. हे काम आता पूर्ण झालं असून ५ जूनपासून सिंहगड किल्ला हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन असून या दिनानिमित्त शिवप्रेमींना गडावर येता यावे, यादृष्टीने सगळं नियोजन करण्यात आलं होतं.

सिंहगड किल्ल्याची माहिती- Sinhagad Fort

सिंहगड किल्ला हा इतिहास, साहस, आणि निसर्ग यांचा संगम आहे. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमामुळे हा किल्ला मराठी मनात रुजलेला आहे. हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील भुलेश्वर रांगेत हा किल्ला वसलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वारे आहेत. पुणे दरवाजापर्यंत मोटाररस्ता आहे, तर कल्याण दरवाजा हा ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. खाजगी वाहन किंवा स्वारगेटहून बसने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येते. सिंहगड किल्ला (Sinhagad Fort) परिसरात तुम्हाला तानाजी मालुसरे स्मारक, राजाराम स्मारक, यादवकालीन शंकराचे कोंढाणेश्वर मंदिर, झुंजार बुरूज, दूरदर्शन मनोरा आणि खंदक यांसारखी वैशिष्टये बघायला मिळतात. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असतो, त्यामुळे हवामान तपासूनच भेट द्या.