SIP Investment | आपल्या भविष्याचा आणि वाढत्या महागाईचा विचार करून गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. आणि या गुंतवणुकीचे महत्त्व आता सगळ्याच नागरिकांना पटलेले आहे. त्यामुळे अनेक लोक हे बँकांच्या एफडीमध्ये पोस्ट तसेच पोस्ट ऑफिसमध्ये त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणूक करत असतात. म्युच्युअल फंडमध्ये (SIP Investment) गुंतवणूक करणे हे अनेकांना जोखमीचे वाटते. परंतु त्यातून परतावा देखील खूप चांगला आहे. आज काल म्युच्युअल फंडचे महत्व देखील अनेकांना पटलेले आहे. आणि अनेक लोक मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. आणि दिवसेंदिवस ही गुंतवणूक वाढतच आहे. या म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला एक रकमी गुंतवणूक करता येते. तसेच दर महिन्याला मासिक गुंतवणूक देखील करता येते. अनेक लोकांना असे वाटते की, एसआयपीमध्ये (SIP Investment) गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे खूप पैसे असणे गरजेचे असते. परंतु हा समज अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही अगदी कमीत कमी पैशात देखील गुंतवणूक करू शकता. आणि योग्य पैसा गुंतवून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करण्याची गरज आहे.
जितक्या लवकर पैसे गुंतवाल तितके जास्त कमवाल | SIP Investment
तुम्हाला जर एसआयपीमध्ये पैसे गुंतवून श्रीमंत व्हायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जितक्या लवकर एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्यास सुरू कराल, तितके जास्त लवकर तुम्हाला पैसे मिळतील. आणि जास्त पैसे मिळतीलम त्यामुळे जर तुम्ही अजूनही एसआयपी सुरू केली नसेल, तर तुम्ही अजिबात उशीर न करता एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करा.
जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करा
एसआयपीमधून जर तुम्हाला जास्त निधी गोळा करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जास्त कालावधीसाठी एसआयपी चालू ठेवणे गरजेचे असते. जरी तुमची एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम कमी असली तरीही तुम्ही ती जास्त कालावधीसाठी गुंतवून ठेवणे खूप गरजेचे असते. जास्त गुंतवणूक कराल किंवा चक्रवाढीचा देखील फायदा येतो. त्यामुळे तुमचे पैसे खूप जलद गतीने वाढतील.
एसआयपीमध्ये खंड पडू नये
एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक शिस्त असणे खूप गरजेचे असते. यासाठी तुम्हाला नियमित गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये खंड पडता कामा नये, जर तुमची एसआयपी मध्येच थांबली, तर तुम्हाला त्याच्या परताव्यावर नक्कीच परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे एसआयपी ही सातत्याने सुरू ठेवा .
गरज आणि जोखीमनुसार योजना निवडा | SIP Investment
एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही लार्ज कॅप, पण साधारणपणे मीड कॅप आणि स्मॉल कॅप फंडापेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि नंतरच गुंतवणूक करा. अशाप्रकारे जर तुम्ही सगळ्या नियमांचे पालन केले आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणूक करून देखील चांगला परतावा मिळवू शकता.