हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर गुंतवणुकीची सवय असेल तर तुमच्यासाठी SIP हा योग्य पर्याय ठरतो. या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात नोकरी करण्याची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला दरमहा 10000 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. या गुंतवणुकीमुळे तुम्ही फक्त 15 वर्षांत करोडपती बनू शकता. तर आज आम्ही तुम्हाला असे काही दीर्घकालीन फंड सांगणार आहोत , ज्यातून तुम्ही जास्त परतावा मिळवू शकता.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी SIP योग्य
म्युच्युअल फंडाच्या स्कीममध्ये म्हणजे SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून तुम्ही दीर्घकालावधीची गुंतवणूक करून शकता. या गुंतवणुकीतून तुम्ही फक्त 15 वर्षांतच करोडपती बनू शकता. SIP मध्ये गुंतवणूक केल्यास कंपाऊंडिंग आणि रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा मिळतो. जर तुम्ही विचार करून एखादा फंड निवडला , ज्याचा वार्षिक परतावा 15 % आहे आणि तुम्ही दर महिन्याला त्या फंडमध्ये 10000 रुपये गुंतवले, तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 1 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा होऊ शकतो. त्यामुळे यामध्ये केलेली गुंतवणूक जास्त नफा मिळवून देते.
मोठे रिटर्न्स मिळवून देणारे फंड
काही म्युच्युअल फंड योजना दीर्घकालीन गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न्स मिळवून देतात . ज्यामध्ये SBI Small Cap Fund, DSP Small Cap Fund, Axis Growth Opportunities Fund यामधील गुंतवणुकीमधून जास्त परतावा मिळत असतो. SBI Small Cap Fund मधून 24.03% चा वार्षिक परतावा मिळतो . या फंडामध्ये दरमहा 10000 रुपये गुंतवले असता 15 वर्षांत 1.35 कोटींची रक्कम मिळू शकते. तर DSP Small Cap Fund च्या माध्यमातून 22.33% चा वार्षिक परतावा आणि या फंडामुळे 15 वर्षांत 1.16 कोटींची रक्कम तयार होते.
चांगला परफॉर्मन्स फंडांवर लक्ष
फंड निवडताना दीर्घकालीन चांगला परफॉर्मन्स असलेल्या फंडांवर लक्ष केंद्रित करावे. स्मॉलकॅप फंड्स अधिक रिटर्न्स देतात, पण त्यामध्ये जोखीम जास्त असते. पण दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये जोखीम कमी असते. जर तुम्ही प्रत्येक वर्षी किंवा दोन वर्षांनी SIP रक्कम वाढवू शकत असाल, तर मोठा फायदा होईल. त्यामुळे तुमच्याकडे 15 वर्षांत 1 कोटींच्या पुढे निधी जमा होईल. गुंतवणुकीच्या कालावधीत बाजारातील चढ उतार येतील पण त्याला घाबरू नका. बाजार स्थिर होताच तुमच्या गुंतवणुकीची किंमत वाढेल.