SIP Investment : SIP मध्ये फक्त 5 हजार गुंतवा अन् मिळवा 50 लाखांहून अधिक परतावा; काय आहे फॉर्म्युला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SIP Investment) आपण कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला की, भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींची चिंता वाटत नाही. कारण, वेळेला असाच गुंतवलेला पैसा आपल्या मदतीसाठी उभा राहतो. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण आर्थिक नियोजन करून भविष्यासाठी निधी जमा करू लागले आहेत. योग्य वयात केलेली गुंतवणूक ही वयाच्या चाळीशीपर्यंत चांगला निधी जमा करण्यास मदत करते. अशा योग्य गुंतवणुकीसाठी SIP हा एक चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये अधिकाधिक पैसे जमा करून भविष्यातील आर्थिक अडचणींवर मात करता येते. अशा या SIP मध्ये केवळ ५ हजारांची गुंतवणूक केल्यास ५ लाखांहून जास्त रक्कम जमा करता येते. ती कशी? हे जाणून घेऊया.

फक्त ५००० रुपयांची SIP बनवेल तुम्हाला लखपती (SIP Investment)

जर तुम्ही गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय शोधत असाल तर SIP हा एक उत्तम पर्याय आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगला निधी जमा करता येईल. समजा, जर तुम्ही SIP मध्ये दरमहा केवळ ५ हजार रुपये गुंतवले तरीही तुम्ही अंदाजे ५५ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. मात्र, यामध्ये तुम्हाला वार्षिक स्वरूपात निदान ५% ते १०% रक्कम वाढवावी लागेल. आता हे कॅल्क्युलेशन नेमकं कसं असतं? याविषयी आपण जाणून घेऊया

कसे व्हाल लखपती?

अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा तुम्ही ५००० रुपयांचा SIP प्लॅन सुरू केला. आता यामध्ये प्रत्येक वर्षाला ५% रक्कम वाढवली तर तुम्ही जमा करत असलेल्या रकमेत वर्षानुवर्ष वाढ होईल. पहिल्या वर्षात प्रतिमहिना ५ हजार गुंतवल्यास तुमची जमा रक्कम ५० हजार होईल. पण जसजशी तुम्ही रक्कम वाढवत जालं तसतशी ही रक्कम मोठी होत जाईल. (SIP Investment) तुम्ही ५ हजार रुपयांचा एसआयपी प्लॅन घेतला असेल तर १ वर्षात फक्त ६० हजार रुपयांची गुंतवणूक करता येईल. मात्र, दुसऱ्या वर्षी तुम्हाला ५ हजार रुपयांसह २५० रुपये मासिक रकमेत वाढ करायची आहे. असे केल्यास तुम्ही प्रतिमहिना ५२५० रुपयांची गुंतवणूक कराल. त्यामुळे दुसऱ्या वर्षी १.२३ लाख रुपये जमा होतील.

अशीच दरवर्षी तुम्ही ५% वाढ सुरु ठेवली आणि १८ वर्षे ही SIP अशीच चालू ठेवलीत तर तुम्ही एकूण १६.८७ लाख रुपये जमा कराल. या प्रकरणात दीर्घ मुदतीचा परतावा गृहीत धरल्यास तुमच्या SIP प्लॅनवर अंदाजे १२% दराने तुम्हाला व्याजातून एकूण ३४.५० लाख रुपये मिळतील. (SIP Investment) म्हणजेच काय? तर तुम्ही जमा केलेली एकूण रक्कम व्याजासकट १८ वर्षांनंतर ५१.४५ लाख रुपये इतकी होईल.