SIP : 500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SIP : कोरोना काळानंतर लोकांचा गुंतवणूक करण्याकडे ट्रेंड वाढतो आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड ही गुंतवणुकीची सर्वात महत्वाची साधने आहेत. अशातच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. म्युच्युअल फंड आणि SIP मधील गुंतवणूक दर महिन्याला वाढत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसे पहिले तर म्युच्युअल फंड मधून साधारणतः 12-13 टक्के वार्षिक रिटर्न मिळते. जर आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर हा रिटर्न 15 ते 24 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग आपल्याला फक्त 500 रुपयांची SIP करून मोठा फंड कसा तयार करता येईल हे समजून घेउयात…

Top 3 Benefits Of Systematic Investment Plan SIP In Mutual Funds

हे आपण एकाउदाहरणाद्वारे समजून घेउयात… आपण समजा SIP मध्ये दररोज 200 रुपये म्हणजेच दरमहा 6000 रुपये गुंतवले आणि या फंडावर 12 टक्के रिटर्न मिळाला तर पुढील 21 वर्षांत आपला 68.3 लाख रुपयांचा फंड तयार होईल. इथे हे लक्षात घ्या कि, जवळपास सर्वच वेबसाइट्सवर म्युच्युअल फंड SIP कॅल्क्युलेटरचा पर्याय उपलब्ध आहे… तसेच याद्वारे आपल्याला किती पैसे जमा करून किती वर्षात किती फंड तयार झाला हे देखील पाहता येऊ शकेल.

Should You Stop or Continue Your SIP in the Current Market Scenario?

15% रिटर्न प्रमाणे

SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर आपण एका स्कीममध्ये 21 वर्षांसाठी दरमहा रुपये 6000 (प्रतिदिवस 200 रुपये) गुंतवले आणि या गुंतवणुकीसाठी आपल्याला 15% रिटर्न मिळाला. तर त्यानुसार 21 वर्षांनंतर आपल्याकडे 1.06 कोटी रुपयांचा फंड असेल.

How to Start SIP? Step by Step Guide to Start SIP Online

चक्रवाढीचा फायदा

हे लक्षात घ्या कि, SIP मधून चक्रवाढीचा प्रचंड फायदा मिळतो. जर आपण 21 वर्षात दररोज 200 रुपयांप्रमाणे 15.12 लाख रुपये गुंतवले आणि यासाठी 15 टक्के रिटर्न मिळाला तर आपल्याला 91.24 लाख रुपयांचा फायदा होईल. म्हणजेच, या गुंतवणुकीद्वारे आपल्याला 6 पट जास्त नफा मिळेल. तसेच जर आपण एखाद्या स्कीममध्ये 25 वर्षांसाठी दरमहा 6000 रुपये (प्रतिदिन 200 रुपये) गुंतवले आणि यावर 15% रिटर्न मिळाला तर 25 वर्षांनंतर आपल्याकडे 1.97 कोटी रुपयांचा फंड तयार होईल.

Stay with your SIP from age 25 to 55

‘या’ चुका करणे टाळा

मोठा फंड जमा करण्यासाठी चांगल्या योजनेत गुंतवणूक करण्याबरोबरच चुका टाळणेही फार महत्वाचे आहे. आपल्याला जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर सर्वांत आधी आपले आर्थिक लक्ष्य निश्चित करा. जर असे केले गेले नाही तर घाईगडबडीत आपल्याकडून चुकीचा फंड निवडला जाऊ शकेल.

इथे हे देखील लक्षात घ्या कि, जेव्हा बाजार घसरतो तेव्हा गुंतवणूकदार घाबरतात आणि त्यानंतर ते एकतर SIP करणे थांबवतात किंवा त्यातून बाहेर पडतात. मात्र असे करणे ही सर्वात मोठी चूक ठरेल. यामधील एक फायदा असा की जेव्हा बाजार घसरतो तेव्हा महागड्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळते. यासाठी आपल्याला फक्त बाजाराच्या हालचालीकडे लक्ष द्यावे लागेल. त्याचप्रमाणे दुसऱ्याकडे पाहून कधीही आपल्या फंडमध्ये बदल करू नका. त्यापेक्षा आधीच चांगला रिसर्च करून आपल्याला योग्य ठरेल असाच फंड निवडा. एकदा पोर्टफोलिओ तयार झाला की त्यावर बारकाईने लक्ष द्या मात्र त्यामध्ये घाईघाईने बदल करणे टाळा.

SIP कॅल्क्युलेटरसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://groww.in/calculators/sip-calculator

हे पण वाचा :

LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे नवीन दर पहा

Airtel च्या ‘या’ 2 प्रीपेड प्लॅन्स मध्ये ग्राहकांना मिळतील अनेक फायदे !!!

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Multibagger Stock : ‘या’ शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 2000% रिटर्न !!!

Leave a Comment