Thursday, March 30, 2023

मोठी बातमी! केंद्राकडून सीरमच्या कोरोनावरील ‘कोविशील्ड’ लसीच्या वापरास मंजुरी

- Advertisement -

नवी दिल्ली । नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांना मोठी बातमी मिळाली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशील्ड लसीचा वापर भारतात सुरू होईल. तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीनं घेतला आहे.

ब्रिटिश सरकारनं काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. ब्रिटन हा ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीला परवानगी देणारा पहिली देश ठरला. ब्रिटननं याच आठवड्यात ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली.

- Advertisement -

त्यामुळे भारतातही ऑक्सफर्डच्या लसीला परवानगी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ऑक्सफर्डनं लसीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी सीरमशी करार केला आहे. सीरमनं आतापर्यंत लसीचे ५ कोटी डोज तयार केले आहेत. भारतात ही लस कोविशील्ड नावानं उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’