नशेच्या धुंदीत सख्ख्या भावाने केला बहीणीचा बलात्कार; मित्राने काढले Video शुटींग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भावाला समाजव्यवस्थेमध्ये आधार आणि जवळचे स्थान आहे. पण हाच भाऊ जर वासनेने धुंद होऊन बहिणीवरच अत्याचार करणारा निघाला तर? अशीच घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे. आरोपीने नशेच्या धुंदीत त्याच्या लग्न झालेल्या लहान बहिणीवर बलात्कार केला. आरोपी सोबत त्याचे मित्रही होते. मित्रांनी मोबाईल मध्ये या घटनेची चित्रफीत केली होती. नंतर त्या चित्रफीत दाखवून आरोपी हे महिलेला ब्लॅकमेल करत होते. यानंतर महिलेने पोलिसांमध्ये तक्रार केली होती.

आरोपींनी महिलेचा पती घरी नसताना घरी जाऊन महिलेचा बलात्कार केला. आरोपी महिलेचा भाऊ असल्यामुळे, महिलेला आरोपीच्या घरच्यांनी तक्रार दिल्यास घरची इज्जत जाईल. असे सांगून तक्रार देऊ दिली नाही. पण जेव्हा आरोपींनी पुन्हा एकदा महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा महिलेने आणि तिच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी वरती भारतीय दंड संहिता
IPC 376 बलात्कार, आयपीसी 452 त्रास देण्याच्या हेतूने घरात बंदी करणे आणि वाईट हेतूने त्रास देणे, IPC 506 गुन्हेगारी प्रवृत्तने वर्तणूक करणे या आरोपांखाली गुन्ह्याची नोंद केली असून आरोपी सद्ध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like