Sunday, May 28, 2023

हाय सिक्योरिटी जेलमध्ये बसून 2 कैद्यांनी बनविली ‘भारत सरकार’ची बनावट वेबसाइट, फसवणूक करण्यापूर्वीच गुपित झाले उघड

चंदीगड । मे आणि जून दरम्यान पंजाबच्या नाभा येथील (Jail in Nabha) उच्च सुरक्षा तुरूंगातून पळून (jailbreak) जाण्याच्या सुनावणीला सामोरे जाणाऱ्या दोन आरोपींनी भारत सरकारची बनावट वेबसाइट (Website of the Government of India) बनविली. गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अखत्यारीत येण्याचा दावा करणारी बनावट वेबसाइट ‘sdrfindia.org’ तयार करुन या दोघांनी तुरुंगातूनच लोकांना फसविण्याचा कट रचला होता. कुरुक्षेत्र येथील अमन उर्फ ​​अरमान आणि लुधियानाचा सुनील कालरा या दोन कैद्यांविरूद्ध फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Fake Website Case: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2021 पासून तुरूंगात असलेल्या अमन याच्याकडून पोलिसांनी एक फोन ताब्यात घेतला होता. त्याच्या कॉल डिटेलमधून मिळालेला डेटा आणि इतर अनेक तथ्यांवरून अमन आणि सुनील कालरा हे एकत्र ही बनावट वेबसाइट चालवत असल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर दोघांनीही वेबसाइटच्या माध्यमातून दरोड्याच्या योजनेचा खुलासा केला आहे.

त्यांच्याविरोधात नोंदविण्यात आलेल्या FIR मध्ये असे म्हटले आहे की, “राज्य आपत्ती प्रतिसाद बल (State Disaster Response Force SDRF) मध्ये अधिकारी आणि स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्याची ऑफर देऊन दोघांनाही लोकांची फसवणूक करायची होती. पोलिसांनी सांगितले की,” त्यांचा तिसरा साथीदार अटक टाळत आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून त्यांना लोकांकडून पैसे वसूल करायचे होते. त्यांना जेल मध्ये मोबाइल फोन कसा मिळाला आणि जेलच्या आतून वेबसाइट कशी बनविली याचा तपास केला जात आहे. होशियारपूर येथील एका महिलेने वेबसाइटसाठी त्यांना मदत केली. ते केंद्र सरकारचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. या दोघांनी त्या महिलेला जेलच्या आतून वेबसाइट बनविण्यास उद्युक्त केले होते, त्या महिलेचा भाऊ एक व्यावसायिक वेबसाइट तयार करणारा आहे. त्याच्या मदतीने महिलेने ती साइट तयार केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे 2021 मध्ये तुरूंगात असलेल्या अमनकडून पोलिसांनी एक फोन ताब्यात घेतला होता. कॉल डिटेल लॅबमधील डेटा आणि इतर अनेक तथ्यांवरून अमन आणि सुनील कालरा एकत्र बनावट वेबसाइट चालवत असल्याचे समोर आले आहे. 17 जून रोजी कोतवाली पोलिसांनी अमन आणि सुनील कालरा यांच्याविरूद्ध फसवणूक केल्याबद्दल आणि IT कायद्यानुसार FIR नोंदवून कोर्टाकडून 1 दिवसाच्या प्रॉडक्शन वॉरंटवर अमनला ताब्यात घेतले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group