Saturday, March 25, 2023

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईतील खारघर येथे असलेले CRPF चे आणखी ६ जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी याबाबत माहिती दिली आहे. खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना याआधीच करोना झाल्याचे समजले होते. आता आणखी ६ जणांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

काल रात्री म्हणजेच २ एप्रिलला उशिरा १४६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालय कळंबोली येथे ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. या सगळ्यांची कोविड-१९ टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी ६ जण पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आहे. CRPFच्या जवानांना तातडीने विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे कमी झाला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार