भयंकर दुर्घटना !! रस्त्यावरील विजेच्या तारांमुळे प्रवासी बसमध्ये पसरला करंट ; सहा जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील महेशपुरा गावांत काल रात्री एक भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक बस वीज तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे बसने पेट घेतला तसेच २० पेक्षा जास्त प्रवाशांना विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसला. या भीषण दुर्घनटनेत सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालोरच्या महेशपूर गावात ही घटना घडली. या बसमध्ये बरेच प्रवाशी होते. रस्ता चुकल्यामुळे ही बस महेशपूर गावानजीक पोहोचली. त्याठिकाणी ड्रायव्हरला रस्त्यावर एक वीजेची तार लोंबकळताना दिसल्यामुळे बस थांबवण्यात आली. तेव्हा क्लीनर बसच्या टपावर चढला आणि त्याने एका काठीच्या मदतीने वीजेची तार वर उचलून धरली.

त्यानंतर ड्रायव्हरने बस पुढे नेली. मात्र, तेव्हा क्लीनरच्या हातातली काठी सटकल्यामुळे वीजेची तार त्याच्या गळ्यात येऊन अडकली. क्लीनर बसच्या छतावर उभा असल्यामुळे वीजप्रवाह संपूर्ण बसमध्ये पसरला. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना वीजेचा झटका बसला. त्यानंतर वीजप्रवाहामुळे बसमध्ये आगही लागली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment