फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला सहा महिने सूट

पुणे : करोना काळात शेतमालाचे नुकसान होऊ नये आणि शहरांमधील शेतमाल पुरवठा सुरळीत राहण्यासाठी फळे, भाजीपाल्याची थेट खरेदी करण्यासाठी आता सहा महिने कोणत्याही परवान्याची अट असणार नाही असे पणन संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. थेट पणनच्या परवान्याला 6 महिने सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फळे भाजीपाला नियुक्तीनंतर बांधावरील खरेदीसाठी थेट पणनचा परवाना घ्यावा लागतो. मात्र सध्याची राज्यातील कोरोना टाळेबंदी ची परिस्थिती पाहता शेतमालाचे नुकसान होऊ नये आणि शहरातील फळे भाजीपाल्याची पुरवठासाखळी सुरळीत राहण्यासाठी खातेदारांना कोणत्याही परवान्याची गरज नसणार आहे.

कोरोना लॉकडाऊन काळात अनेक शेतकरी आणि युवकांनी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायावर देखील परिणाम होऊ नये यासाठी पणन संचालक सतीश सोनी यांनी थेट परवान्याची आठ तीन महिन्यांसाठी शिथिल केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like