औरंगाबाद | स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हटविल्याचा आरोप करीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे नवनियुक्त उप सभापती अर्जुन शेळके यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिटीचौक पोलीसांनि या सहा पदाधिकाऱ्यांना आज सकाळी अटक करण्यात आली. पंचायत समिती गट नेता अनुराग आप्पासाहेब शिंदे, पं.स.सदस्य विजय शेषराव जाधव, शिवसेना विभाग प्रमुख मंगेश काशीनाथ जाधव, गौतम कांतीलाल उबाळे,उल्हास दिनकर देशमुख, जाफर बहाद्दूर खान पठाण अशी अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
2 ऑगस्ट रोजी पंचायत समितीचे नवनियुक्त उप सभापती अर्जुन शेळके यांनी त्यांच्या दालनात असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हटविल्याचा आरोप करीत सात ते आठ कार्यकर्त्यांनी शेळके यांना खुर्च्या, हाता चापटाने मारहाण केली होती. या मारहाणीत शेळके जखमी झाले होते.
या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिटीचौक पोलिसांनी घटनेची हकीकत जाणून घेण्यासाठी पंचायत समिती मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. त्या आधारे तपास करून आज पोलिसांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहा पदाधिकारी यांना अटक केली आहे. दुपार पर्यंत अटकेची प्रक्रिया सुरू होती. अटकेतील सहाही पदाधिकाऱ्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.