औरंगाबाद | शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. शहरातील महापालिका आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे.
जानेवारी महिन्यापासून शहरात एकूण तीस डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले असल्याचे, महापालिकेच्या अहवालातून समजली आहे . शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून शहरात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यातच डेंग्यूने डोके वर काढले आहे.
पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढली असून हिवताप, मलेरिया , डेंग्यू सारखे सातगुचे आजार होण्याची शक्यता आहे .
मनपाकडून सादर झालेल्या अहवालात जानेवारी ते १५ जुलै पर्यंत शहरात एकूण ३० डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यातला एकही रुग्णाचे अहवाल डेंग्यू पॉसिटीव्ह नाहीये.
शहरात डेंग्यूचा उद्रेक दर एक वर्षा ऍड होत असल्याचे मनपा अहवालातून आढळले आहे.