हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Skin Cancer यावर्षी नेहमीपेक्षा उन्हाळा जास्त प्रमाणात जाणवत आहे. संपूर्ण देशात उष्णतेची लाट पसरलेली आहे. अशा परिस्थितीत लोकांना उष्माघाताचा देखील त्रास होत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. अशातच एक धक्कादायक दावा समोर आलेला आहे.
एका रिपोर्टनुसार या वाढत्या उन्हामुळे लोकांना स्किन कॅन्सरचा (Skin Cancer ) धोका वाढलेला आहे. याला मिलोनिमा कॅन्सर असे देखील म्हणतात. शरीराच्या विशिष्ट भागावर उन्हाचा चटका जास्त प्रमाणात पडल्याने या कॅन्सरचा धोका वाढत आहे. त्यामुळे तज्ञांनी या उन्हाळ्यामध्ये स्वतःची जास्त काळजी घेण्यास सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात स्वतःला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. तसेच 11 ते 4 यादरम्यान घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील तज्ञांनी दिलेला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला जर बाहेर जायचे असेल, तर सकाळी 7 ते 9या दरम्यान बाहेर जावे. या वेळी मिळणाऱ्या प्रकाशातून विटामिन डी मिळते. परंतु यानंतर येणारा सूर्यप्रकाश हा आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचा तुमच्या स्किनला मोठ्या प्रमाणात धोका होतो. यामुळे तुमच्या स्किनला कॅन्सर होण्याची देखील शक्यता आहे. हा कॅन्सर शक्यतो मानेला होण्याचा धोका आहे.
या स्किन कॅन्सरची (Skin Cancer ) लक्षणे म्हणजे तुमची त्वचा लाल पडते. जागोजागी खाज येते. त्याचप्रमाणे पांढरे डाग पडतात. अशी सगळी लक्षणे दिसल्यास तुम्हाला स्किन कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. उन्हाळ्याच्या या दिवसात आपल्या शरीरावर देखील खूप परिणाम होत आहे. त्यामुळे त्वचेसंबंधित वेगळे काही जाणवल्यास लगेच डॉक्टरांची संपर्क साधून उपचार घ्या.
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे चक्कर येणे, थकवा येणे, डोळ्यावर अंधारी येणे समस्या निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात स्वतःला हायड्रेट ठेवणे आणि जास्तीत जास्त पाणी पिणे खूप गरजेचे आहे. याशिवाय घराच्या बाहेर जाताना सैल कपडे घालणे तयाचप्रमाणे स्किनला सनस्क्रीन लावणे गॉगल घालणे खूप गरजेचे आहे.
या दिवसांमध्येच स्वतःच्या शरीराला हायड्रेट ठेवणे. खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळे वारंवार पाणी पिणे, रसदार फळे खाणे, बाहेर गेल्यावर फळांचा ज्यूस पिणे. खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या शरीराला खूप फायदा होईल.