Indian Railways Speed : रात्रीच्या वेळेत रेल्वेगाड्या फास्ट का धावतात?? कारण वाचून व्हाल दंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरलेले आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्याही भलीमोठी आहे. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे कमी पैशात प्रवास होत असल्याने अनेक प्रवाशी रेल्वेला आपली पसंती दर्शवतात. गेल्या काही वर्षात रेल्वेचा मोठा विकास आणि विस्तार झाला आहे. सरकारने रेल्वेचा कायापालट केला असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. रेल्वे प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे विभागकडून सतत नवनवीन पाऊले उचलली जात आहेत, रेल्वेचा वेग (Indian Railways Speed) वाढवला जात आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? कि दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेत त रेल्वेगाड्या फास्ट का धावतात? चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…..

याचे पहिले कारण म्हणजे, रात्रीच्या वेळी रेल्वे रुळावर हालचालींना फारसा वाव नसतो. रात्रीच्या वेळी रेल्वे रुळांवर माणसे किंवा प्राणी आडवे येत नाही. कोणाचा आवाज किंवा कोणताही गोंगाट नसतो. याशिवाय रात्रीच्या वेळी रेल्वे रुळांवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जात नाही. त्यामुळे रात्री ट्रेनचा वेग (Indian Railways Speed) जास्तच राहतो.

अंधाराचा फायदा मिळतो – Indian Railways Speed

दुसरे कारण म्हणजे रात्रीच्या अंधाराचा फायदा… अंधारात ट्रेन चालवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे लोको पायलटला लांबूनच सिग्नल्स दिसतात. अशा परिस्थितीत ट्रेन थांबवायची आहे की नाही हे लोको पायलटला दुरूनच कळते. यामुळे लोको पायलटला ट्रेनचा वेग कमी करण्याची गरज नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी ट्रेन सतत वेगाने धावत असल्याचे दिसते.

वास्तिव विचार केला तर रेल्वेमध्ये दिवसाच्या वेळेला प्रवाशांची गर्दी जास्त असते. तसेच सर्वत्र गोंगाट असतो,,, उन्हामुळे लांबून सिग्नल व्यवस्थित दिसत नाही. एवढेच नाही तर दिवसाही लोक रेल्वे रुळांवर इकडे तिकडे फिरत असतात. अशा परीस्थितीत चालकाला अत्यंत सावधपणे ट्रेन चालवावी लागते.आणि त्यामुळे दिवसाच्या वेळेस रेल्वेचं स्पीड हे जास्त नसते.