Skin Care Tips : सौंदर्याची हाव पडेल महागात; ‘हे’ घरगुती उपाय लावतील त्वचेची वाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही? पण सुंदर दिसण्यासाठी अति आग्रही असणे कधीही त्रासदायक ठरू शकते. असे लोक सुंदर दिसायचंय म्हणून काय वाट्टेल ते करायला तयार होतात. पण अनेकदा बाहेरील ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ट्रीटमेंट्स महाग आहेत म्हणून वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेले वेगवेगळे उपाय घरच्या घरी केले जातात.

निश्चितच काही घरगुती उपाय हे अत्यंत जालीम आणि प्रभावी असतात. पण सगळेच उपाय चांगले किंवा योग्य असतील असे काही खात्रीने सांगता येत नाही. (Skin Care Tips) अज्ञानामुळे किंवा उगाच कुणाचं काही ऐकून आपण त्वचेवर जे वेगवेगळे प्रयोग करतो त्यामुळे सौंदर्यात वाढ होत नाही. मात्र, सौंदर्याची वाट लागते. अशाच काही अपायकारक घरगुती उपायांची आज आपण माहिती घेणार आहोत.

लिंबू- साखरेने स्क्रबिंग

बरेच लोक घरच्या घरी त्वचा स्क्रब करण्यासाठी लिंबू आणि साखर यांचा एकत्रित वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का? या उपायाने तुमच्या त्वचेला बरीच हानी पोहचू शकते. (Skin Care Tips) एकतर साखरेमुळे त्वचेवर ओरखडे येऊन जखमा होऊ शकतात आणि दुसरं लिंबातील अॅसिड तुमची त्वचा कोरडी करू शकते. ज्यामुळे त्वचेच्या विविध समस्या होऊ शकतात.

आईस फेशियल (Skin Care Tips)

घरच्याघरी आईस फेशियल करणे सध्या चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. क्षणिक सुखासाठी केलं जाणारं हे फेशियल कितीही चांगला वाटत असलं तरीही त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. कारण यासाठी फ्रिजरमधला बर्फ काढून थेट त्वचेवर मसाज केल्यास त्वचेचे बरेच नुकसान होते. जर तुम्हीही असे फेशियल करत असाल तर यासाठी बर्फ एका कपड्यात गुंडाळून मग त्वचेवर फिरवा किंवा बर्फाच्या पाण्याचा वापर करा. ज्यामुळे त्वचेला नुकसान होणार नाही.

पिंपल्स घालवण्यासाठी टूथपेस्टचा वापर

अनेकांना चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात. ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे बरेच लोक हे पिंपल्स घालवण्यासाठी विविध उपाय करतात. त्यापैकी एक म्हणजे चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी टुथपेस्टचा वापर करणे. (Skin Care Tips) एकतर यामुळे पिंपल्स जात नाहीत आणि दुसरी गोष्ट टूथपेस्टमुळे पिंपल्स आणखी चिघळून त्याच्या जखमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय म्हणून प्रयोग करत असाल तर आत्ताच थांबवा.

त्वचा सुंदर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर

बरेच लोक त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात. तास बेकिंग सोडा हा ठराविक प्रमाणात वापरला तर तो त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. पण त्याचं प्रमाण जर का चुकलं किंवा त्याचा अतिरेक झाला तर मात्र त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जे काही केल्या निस्तरणे शक्य होत नाही.

घरच्याघरी व्हॅक्सिन

फेशियल हेअर किंवा हातापायावरचे केस काढण्यासाठी घरच्याघरी व्हॅक्सिंग केली जाते. यासाठी अनेक जण साखरेचा पाक, गुळाचा पाक करून होममेड व्हॅक्स तयार करतात. (Skin Care Tips) पण, खरतर हा प्रयोग नसून धोकादायक स्टंट आहे. कारण, यामुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही असे प्रयोग करत असाल तर तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही याची आधी खात्री करून घ्या.