Skin Care Tips : पावसाळ्यात ‘या’ गोष्टी टाळा; नाहीतर, चेहरा होईल खराब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या शारीरिक आरोग्यासह त्वचेचे आरोग्य देखील खराब होत असते. पावसाळ्यात वातावरणामध्ये असलेली आर्द्रता त्वचेला तेलकट आणि चिकट बनवते. ज्यामुळे हवेतील धुळीचे कां अगदी सहज आपल्या त्वचेवर चिकटतात आणि यामुळे चेहरा हळूहळू खराब होऊ लागतो.

पुरळ येणे, रॅशेस येणे, मुरुमांचा त्रास आणि चेहऱ्यावरील चमक निघून जाणे. अशा बऱ्याच गोष्टी पावसाळ्यात होऊ शकतात. त्यामुळे या काळात आपल्याला स्किन केअर रुटीन बदलणे फार आवश्यक आहे. (Skin Care Tips) आपल्या रोजच्या रुटीनमधील बऱ्याच गोष्टींमुळे त्वचेचे नुकसान होत असते आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. मग अशावेळी पावसाच्या दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमचा चेहरा खराब होणार नाही.

ग्रीसी मॉइश्चरायझरचा वापर टाळा (Skin Care Tips)

आपल्या त्वचेला कोणत्याही ऋतूमध्ये मॉइश्चरायझरची गरज असते. यात काही शंकाच नाही. मात्र, पावसाळ्यात हेवी आणि ग्रीसी मॉइश्चरायझर्सचा वापर अजिबात करू नका. यामुळे त्वचा खूप जसेच्या चिकट होते आणि यामुळे धूळ व मातीचे कण चेहऱ्यावर जमा होतात. परिणामी चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होते. तुमच्या त्वचेवर मुरूम, पुरळ येऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेला मॉइश्चराइज करायचे असेल तर लाइट वेट आणि नॉन कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

हार्श एक्सफोलिएटर वापरू नका

आपल्या त्वचेला स्क्रबची गरज असते आणि म्हणून जर तुम्ही हार्श एक्सफोलिएटर वापरत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करताय. कारण असे एक्सफोलिएटर आपल्या त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकतात आणि यामुळे त्वचा कोरडी व निस्तेज होते. (Skin Care Tips) त्यामुळे स्क्रब खरेदी करताना त्यावर लिहिलेली माहिती नीट वाचा. ज्यामुळे तुम्ही विकत घेत असलेल्या स्क्रबमध्ये कोणकोणते घटक तसेच रसायने वापरली आहेत? हे तुम्हाला कळेल.

ऑईली प्रोडक्ट्सचा वापर नकोच

जस ऋतू बदलतो तसं स्किन केअर रुटीन बदलायला हवं. त्यामुळे पावसाळ्यात स्किन केअर रुटीनमध्ये बदल करणे गरजेचे असते. या दिवसात त्वचेची योग्य काळजी घेताना ऑईली प्रोडक्ट्सचा वापर अजिबात करू नका. (Skin Care Tips) आधीच हवेतील आद्रतेमुळे आपला चेहरा ऑईली होत असतो. त्यात तुम्ही ऑईली प्रोडक्ट्सचा वापर केल्याने चेहरा आणखी ऑईली होऊन त्वचेवर पुरळ येऊ शकतात. त्यामुळे या दिवसात पाणी आणि मिनरल बेस्ड गोष्टींचा वापर करावा.

हेवी मेकअप अजिबात करू नका

बऱ्याच मुलींना घरातून बाहेर पडताना हेवी मेकअप करायची सवय असते. मात्र, पावसाळ्यात हेवी मेकअप करणे त्रासदायी ठरू शकते. कारण, हवामानातील आर्द्रतेमुळे मेक- अप सहज मेल्ट होतो आणि आपली त्वचा खराब करतो. अशा मेकअपमुळे त्वचेची छिद्र बंद होतात आणि यामुळे ब्रेकआउट होऊन त्वचेचे नुकसान होते. (Skin Care Tips) त्यामुळे पावसाळ्यात हलका मेकअप करा आणि झोपण्यापूर्वी मेकअप आठवणीने काढा.

‘या’ चुका करू नका

1) पावसाळ्याच्या दिवसात चुकूनही गरम पाण्याने चेहरा धुवू नका. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते. त्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.

2) पावसात भिजल्यावर चेहऱ्याला सतत हात लावू नका. घाणेरड्या हातांमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. चेहऱ्यावर फोड येऊ शकतात. त्यामुळे टिश्यू किंवा रुमालचा वापर करा. (Skin Care Tips)

3) पावसाळा सुरु आहे म्हणून सनस्क्रीन वापरणे बंद करू नका. ऋतू कोणताही असो हवामान कसेही असो सनस्क्रीनचा वापर करायला हवा.