हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) गेल्या काही दिवसात तापमान इतकं जास्त वाढलंय की, गरमीने सगळेच हैराण झाले आहेत. अशा दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजचे असते. खास करून त्वचेची काळजी घ्यायला हवी, असे प्रामुख्याने सांगितले जाते. कडक उन्हामुळे टॅनिंगची समस्या होतेच शिवाय पिंपल्स आणि रिंकल्सच्या समस्या देखील वाढू शकतात. अशावेळी काय केल्यास आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होणार नाही? याबाबत कायम विचारणा केली जाते. त्याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
उन्हाळ्यातसुद्धा डागरहित आणि चमकदार त्वचा हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला ज्या ४ महत्वाच्या टिप्स देणार आहोत त्या वापरून पहा. ऋतू बदलत राहिले तरीही तुमची त्वचा मात्र, तेजस्वी आणि चमकदार राहील.
टिप 1 : चेहरा धुणे (Skin Care Tips)
उन्हाळ्याच्या दिवसात प्रतिदिन किमान २ वेळा तरी चेहरा धुणे गरजेचे आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार समजून घ्यावा लागेल. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश निवडा आणि दिवसभरातून किमान दोनवेळा चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि माती स्वच्छ होण्यास मदत होईल. यामुळे पिंपल्स आणि रिंकल्सची समस्या होणार नाही.
टिप 2 : सनस्क्रिनचा वापर
उन्हाळ्याच्या दिवसात टॅनिंगपासून बचाव करायचा असेल तर चांगले सनस्क्रिन वापरा. (Skin Care Tips) ऋतू कोणताही असला तरी सनस्क्रीन जरूर वापरा. यामुळे सूर्याच्या अतिनिल किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण होईल आणि प्रदूषणामुळे चेहरा खराब होणार नाही.
टिप 3 : एक्सफोलिएट करणे
उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेताना एक्सफोलिएट करणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी तुमच्या त्वचेचा प्रकार काय आहे ते समजून घ्या आणि त्यानुसार स्क्रबची निवड करा. (Skin Care Tips) हा स्क्रबर खरेदी करताना तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या होणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच आपल्या त्वचेला काय समस्या आहेत? हे लक्षात घेऊन स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे बंद होईल आणि चेहरा खराब होणार नाही.
टिप 4 : भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात शरीर लगेच डिहायड्रेट होऊ शकते. डिहायड्रेट होणे म्हणजे काय? तर शरीरातील पाणी कमी होणे. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेला डिहायड्रेट होण्यापासून थांबवणे गरजेचे आहे. (Skin Care Tips) यासाठी दिवसातून किमान ४ ते ५ लिटर पाणी प्या. यामुळे तुमची त्वचा सुधारेल आणि पिंपल्सच्या समस्येपासून तुमची सहज सुटका होईल.