Skin Care Tips In Summer | उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी, त्वचा तज्ज्ञांनी दिला सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Skin Care Tips In Summer | फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे. आणि उन्हाचा तडाका देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्याचप्रमाणे उष्णता देखील वाढत चाललेली आहे. या उन्हाळ्यामध्ये अनेक लोक बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असतात. परंतु बाहेर फिरल्याने अति उष्णता त्याचप्रमाणे सूर्याची अतिनील किरणे त्याच्यप्रमाणे आद्रता या सगळ्यामुळे आपल्या त्वचेवर मात्र त्याचा खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे या उन्हाळ्यात आपल्याला एन्जॉय करायचे असेल, तरी आपण आपल्या स्किनची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

परंतु आता डॉक्टर मारा वेन्स्टीन यांनी या उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची. आपली त्वचा निरोगी आणि तेजस्वी कशी ठेवायची. याबद्दल काही टिप्स सांगितल्या आहेत. त्या आपण जाणून घेऊया जेणेकरून या हिवाळ्यात तुम्ही तुमची त्वचा खूप चांगल्या प्रकारे ठेवू शकता.

आतून आणि बाहेरून हायड्रेट रहा

सुंदर दिसण्यासाठी आपली बॉडी आतून हायड्रेट असणे खूप गरजेचे असते. त्याचमुळे आपली त्वचा देखील चांगली राहते. परंतु आपली बॉडी हायड्रेट नसेल तर आपली त्वचा कोरडी पडते. त्याचप्रमाने निस्तेज दिसते. आणि अगदी बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील येऊ लागतात त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट ठेवणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त घाम येतो. आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे खूप गरजेचे आहे. आपण जर जास्त पाणी पिले तर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीरावर टाकण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्ही बाहेर कुठेही जात असाल तर तुमच्या सोबत पाण्याची बाटली ठेवायला विसरू नका. जर तुम्हाला सारखं सारखं पाणी पिता येत नसेल तर अशावेळी काकडी, लिंबू तसेच पुदिन्याची पाने यांसारख्या गोष्टी खा. त्याचप्रमाणे Hyaluronic acid यांसारखे घटक जर तुमच्या त्वचेवर लावले तर तुमची त्वचा नेहमीच हायड्रेट राहील.

सनस्क्रीन वापरणे | Skin Care Tips In Summer

आपल्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण करण्यासाठी उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचे आहे. ते म्हणजे सनस्क्रीन. उन्हात आपल्याला सूर्यापासून आपल्या त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे आपण घराच्या बाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन वापरणे खूप गरजेचे आहे. नेहमी 30 पेक्षा अधिक एसपीएफ असलेल्या ब्रँड तुम्ही सनस्क्रीन म्हणून वापरा. त्यामुळे तुमच्या त्वचेला संरक्षण मिळेल तुमच्या त्वचेचे जे काही भाग उघडे आहेत त्यामुळे तुम्हीही सनस्क्रीन वापरू शकता .

तुम्ही टायटॅनियम डाय ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड यांसारख्या संस्कृतची देखील निवड करू शकता. यामुळे सूर्याची किरणे तुमच्या त्वचेमध्ये प्रवेश करू शकत नाही त्याचप्रमाणे यातील काही घटक हे किरणांना परावर्तित करतात.

डबल सनस्क्रीन लावा

तुम्ही जर सतत उन्हात असाल तर दर दोन तासांनी तुम्ही सन स्क्रीन लावले तरी चालेल. त्यामुळे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणात देखील तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. तुम्ही ढगाळ वातावरणात देखील सनस्क्रीन वापरू शकता. ढग सूर्याची किरणे लपवतात. परंतु त्यांना रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही घरात किंवा कारमध्ये बसल्यावरही त्वचेच्या संरक्षणासाठी संस्कृत लावू शकता.

अँटिऑक्सिडंट गोष्टी स्वीकारा

अँटिऑक्सिडंट हे तुमच्या त्वचेसाठी खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये सूर्यामुळे येणारी अस्थिर रेणू ज्याला आपण फ्री रॅडिकल्स असे म्हणतो. त्यामुळे त्वचेतील पेशींचे नुकसान होते. त्यामुळे बेरी, लिंबूवर्गीय, फळे, पालेभाज्या ग्रीन टी यांसारखे अँटिऑक्सिडंट गोष्टींचा तुमच्या जीवनामध्ये समावेश करा. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावले तरी चालेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ केली तरी देखील तुमची त्वचा खूप थंड राहील आणि त्वचेमध्ये ओलावा निर्माण होईल.