सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावातील गगनचुंबी वडाच झाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

आज वट पौर्णिमेचा सण महिला वर्गातून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.  महिलांनी आपल्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाचे पूजन केले. मात्र, या वडाच्या झाडांपैकी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असणारे वडाचे झाड हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील म्हसवे गावात वाढत आहे. गगनचुंबी अशा या महाकाय वडाच्या झाडाची आजच्या दिवशी गावातील महिलांकडून पूजा केली गेली आहे.

जावळी तालुक्यातील म्हसवे गावात तब्बल साडे पाच एकरात हे वडाचे झाड पसरले आहे. 1880 सालापूर्वी एक वडाचं झाड होत आणि कालांतराने या एका वडाच्या झाडाचा पसारा फुलत गेला. पचवडपासून काही किलोमीटर पुढे गेलं कि म्हसवे हे गाव लागते. गावाला तिन्ही बाजूने हिरवागार डोंगराने व्यापलेले आहे. आणिया परिसरात असलेल्या वैराटगड या नावाच्या डोंगराच्या पायथ्याला हे म्हसवे गाव वसलेले आहे. या गावाचे मूळ नाव हे म्हसवे आहे. मात्र, गावातील महाकाय वडाच्या झाडामुळे गावाच्या नावाचे रुपडे पालटले असून गावाला म्हसवे वडाचे म्हणून ओळखले जाते.

या झाडाबद्दल गावातील ग्रामसंस्थांकडे विचारणा केली असता त्यांनी धक्क्कादायक माहिती दिली. इंग्रजांच्या काळातील इंग्रज अधिकारी ली वॉर्नर यांनी आशिया खंडातील सर्वाधिक मोठे झाड म्हणून या झाडाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे झाड गावासाठी व राज्यासाठी एक प्रकारचा अनमोल ठेवा असल्यासारखे आहे. प्रत्येक वटपौर्णिमेला या ठिकाणच्या वडांच्या झाडांचे पूजन करण्यासाठी पंचक्रोशीतील महिला म्हसवे गावात येतात. आपल्या मनपसंतिच्या झाडाचे त्यांच्याकडून गटागटाने पूजन केले जाते. ऐतिहासिक ठेवा असलेले हे वडाचे झाड सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे

Leave a Comment