Sleep Divorce : पार्टनरसोबत पटत नाही? वेगळं व्हायचंय? तर ‘स्लीप डिव्होर्स’ घ्या आणि नात्याला दुसरी संधी द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sleep Divorce) ‘डिव्होर्स’ हा नुसता शब्द जरी ऐकला तरी सगळ्यात पहिलं लक्षात येतं ते म्हणजे घटस्फोट. अर्थात नात्यातून विभक्त होणे. पण तुम्ही कधी ‘स्लीप डिव्होर्स’ हा शब्द ऐकला किंवा वाचला आहात का? आजकालच्या पिढीतील एक नवा ट्रेंड म्हणून ‘स्लीप डिव्होर्स’ प्रचंड चर्चेत आहे. ज्याच्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. पण ज्यांना माहिती आहे त्यांना याचा बराच फायदा झालाय. ‘स्लीप डिव्होर्स’ म्हणजे काय तर नात्यातील ताण- तणाव दूर करण्यासाठी केलेला एक साधा आणि सोपा उपाय.

अनेकदा कामाचा ताण, घरातील छोट्या- मोठ्या कुरबुरी, आर्थिक समस्या, अचानक आलेले परिवर्तन यामुळे जोडप्यांच्या नात्यावर गंभीर परिणाम होतो. (Sleep Divorce) छोटे- मोठे वाद कालांतराने मोठ्या भांडणांचे स्वरूप घेतात. पुढे जाऊन ही भांडणं इतकी टोकाला पोहोचतात की, शेवटी दोघांनाही एकमेकांपासून वेगळे व्हावेसे वाटते. आजपर्यंत अनेक जोडपी अशाच विविध कारणांमुळे एकमेकांपासून विभक्त होताना दिसली आहेत. यातली बरीच कारण अगदी शुल्लक सुद्धा असतात. मात्र वेळीच त्यावर काम न केल्यामुळे पुढे जाऊन ही जोडपी तुटताना दिसतात.

वेगळे झाल्यानंतर आपण आनंदात राहू असा एक समज बाळगून विभक्त झालेली माणसं कालांतराने मात्र एकमेकांचा सहवासासाठी तरसु लागतात. अशावेळी कुणाची तरी सोबत हवी असे वाटू लागते. पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो आणि आयुष्यातील महत्त्वाचा काळ वाया गेलेला असतो. तर असं तुमच्या बाबतीत घडू नये म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ‘स्लीप डिव्होर्स’विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

‘स्लीप डिव्होर्स’ म्हणजे नक्की काय? (Sleep Divorce)

‘स्लीप डिव्होर्स’ म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जोडप्याने वेगवेगळे झोपणे. होय. ‘स्लीप डिव्होर्स’मध्ये एखादे जोडपे म्युच्युअली ठरवून वेगवेगळ्या बेडवर किंवा वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपतात. यालाच ‘स्लीप डिव्होर्स’ म्हणतात. बदलत्या लाइफस्टाइलमूळे नाते संबंधात फार तणाव निर्माण होतो.

(Sleep Divorce) एकमेकांना वेळ न देता येणे आणि त्यामुळे वाढणारे गैरसमज हे याचे मुख्य कारण. या लहान वाटणाऱ्या गोष्टी नात्यात असणाऱ्या तिला किंवा त्याला लागतात की, हे जोडपं पुढे घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण घटस्फोट घेण्याआधी जर तुम्ही ‘स्लीप डिव्होर्स’ ट्राय केलात तर कदाचित तुम्ही तुमचं नातं वाचवू शकता.

‘स्लीप डिव्होर्स’चे फायदे

मित्रांनो अपुरी झोप हे देखील नात्यात कडवटपणा आणण्यासाठी पुरेसे कारण आहे. अपुऱ्या झोपेमुळे माणूस चिडचिडा होतो आणि अशावेळी छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होऊ लागतात. अशावेळी ‘स्लीप डिव्होर्स’ फायदेशीर ठरते. वेगवेगळं झोपल्याने आपला पार्टनर काय करतोय याकडे लक्ष जाणार नाही. (Sleep Divorce)

काहींना उशिरा झोपायची सवय असते. ज्यामुळे पार्टनरची झोप खराब होते. यामुळेदेखील अनेकदा भांडण होतात. तर अशावेळी स्लीप डिव्होर्स घ्या. यामुळे दोघांनाही आपल्या सवयी न बदलता पूर्ण झोप घेता येईल. हे तुमचे नाते वाचवण्यासाठी अगदी फायदेशीर उपाय ठरू शकतो.

अनेकांना रात्री काम करण्याची, पुस्तक वाचण्याची सवय असते. (Sleep Divorce) मात्र दुसऱ्या पार्टनरला यात काहीही रस नसतो. ज्यामुळे भांडणाला आणखी एक कारण मिळते. अशावेळी काही दिवसांसाठी ‘स्लीप डिव्होर्स’ घ्यावा.

कधीकधी पार्टनरचं घोरणं सुद्धा त्रासदायी वाटतं. मग अशावेळी होणारे वाद टाळायचे असतील तर ‘स्लीप डिव्होर्स’ बेस्ट पर्याय आहे.

‘स्लीप डिव्होर्स’ हा वेगळं होण्यासाठी नव्हे तर वेगळं होण्याच्या विचारांवर अंकुश लावण्यासाठी कामी येणारा उपाय आहे. स्लीप डिव्होर्समूळे जोडप्यांना आपल्या नात्यात येणारी समस्या समजते. शिवाय विचार करायला वेळ मिळतो. तसेच आपल्याला आपल्या पार्टनरची गरज आहे याची उपरती होते. (Sleep Divorce) त्यामुळे नात्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या समस्यांवर काम करा. कारण तोडणं सोप्प आहे पण टिकवणं कठीण.