Sleeping With Mobile | आजकाल मोबाईल फोन वापरणे ही काळाची गरज झालेली आहे. अगदी प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो आणि या फोनपासून आपण काही मिनिट देखील लांब राहत नाही. एवढंच न अगदी झोपताना देखील आपण मोबाईल लांब ठेवत नाही. झोपले की आपल्या उशी जवळच मोबाईल ठेवतो. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होतो. तुम्हाला देखील रात्री झोपताना तुमच्या उशी जवळ मोबाईल फोन ठेवून झोपण्याची सवय असेल, तर ती सवय आजच बंद करा. कारण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. काही लोक हे रात्री अचानक जाग आली, तरी मोबाईल फोन चेक करतो. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक (Sleeping With Mobile) आहे. आज आम्ही तुम्हाला यामुळे काय होते हे सांगणार आहोत.
मोबाईल आरोग्यासाठी हानिकारक | Sleeping With Mobile
मोबाईल हे एक इलेक्ट्रिक गॅजेट आहे. त्यामुळे यामधून नेहमीच रेडिएशन निघत असतात. आणि हे रेडिएशन आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात. मोबाईल मधून येणारे रेडिएशन इरेक्टाईल डीसफंक्शनशी जोडलेले असतात. या मधून निघणारा निळा प्रकाश यामुळे झोप आणि आपल्या हार्मोनलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. आणि आपल्याला विविध समस्यांना सामोरे जात जावे लागते.
आरोग्य संबंधित समस्या
फोन मुळे डोकेदुखी, स्नायू दुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या नुसार आपल्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे कर्करोगाचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे दुखणे, चिडचिड होणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.
झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवावा
मोबाईल मधून जास्त रेडिएशन्स निघतात. त्यामुळे झोपताना मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा. त्यामुळे आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. अनेक वेळा लोकांना मोबाईल पाहिल्याशिवाय झोप येत नाही. अशावेळी तुम्ही मोबाईल लांब ठेवून पुस्तक वाचायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला झोप देखील येईल आणि त्रास देखील होणार नाही.
या मार्गांचा अवलंब करा | Sleeping With Mobile
तुम्हाला जर मोबाईलचे व्यसन सोडायचे असेल, तर तुम्ही काही ठिकाणी मोबाईल वापरायला बंदी करा. जसे की डायनिंग टेबल बेडरूम टीव्ही बघताना इतरांशी बोलताना मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करा. तसेच आठवड्यातला एक दिवस असा निश्चित करा की, त्या दिवशी मोबाईल तसेच टीव्ही सगळे बंद असणार आहे. आणि लहान मुलं देखील मोबाईल पासून दूर राहतील. अशावेळी तुम्ही सगळेजण एकत्र मिळून चांगले क्षण अनुभवू शकता. आणि मुलांना देखील मोबाईलच्या सवयीपासून दूर राहता येईल.