हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. हे नवीन व्याजदर 9 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. यानंतर आता बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 120 महिन्यांच्या FD वर 3.75 टक्के ते 6 टक्के वार्षिक दराने व्याज देईल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 4.50 ते 6.75 टक्के दराने व्याज दिले जाणार आहे. आता बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त 7.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के व्याज दिले जाईल.
हे लक्षात घ्या कि, बँकेकडून याआधी 7 दिवस ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.90 टक्के दराने व्याज दिले जात होते जे आता 3.75 टक्के करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, बँकेने 30 दिवस ते 89 दिवस मुदतीच्या FD वर 4.25 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, सहा महिन्यांच्या एफडीवर 5 टक्के व्याज दिले जात होते, जे आता 5.25 टक्के करण्यात आले आहे. Bank FD
असे असतील नवीन व्याजदर
ग्राहकांना 90 ते 179 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच सहा महिन्यांपेक्षा कमी ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर, ग्राहकांना आता वार्षिक 5.50 टक्के दराने व्याज दर दिला जाईल. त्याच बरोबर 9 महिन्यांच्या FD वर 5.75 टक्के व्याज दर मिळेल. Bank FD
उज्जीवन स्माल फायनान्स बँकेच्या 9 महिन्यांपासून ते 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50 टक्के दराने व्याज दर मिळेल. तसेच 12 महिन्यांच्या एफडीवर आता 7 टक्के व्याज दर दिला जाईल. 525 दिवसांच्या एफडीवर 7.50 टक्के तर 12 महिने ते 524 दिवसांच्या एफडीवर 7.20 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. त्याचप्रमाणे 526 दिवस ते 18 महिन्यांच्या एफडीवरही 7.20 टक्के व्याज दर मिळेल. Bank FD
बँकेकडून ग्राहकांना आता 24 महिने आणि एक दिवस ते 989 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के व्याज, 990 दिवसांच्या FD वर 6.50 टक्के आणि 36 महिन्यांत आणि एक दिवस ते 42 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के व्याज मिळेल. त्याचप्रमाणे 991 दिवसांपासून ते 36 महिन्यांच्या FD वर 6.50 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच 42 महिने एक दिवस ते 60 महिने पूर्ण झालेल्या FD वर आता 7.20 टक्के व्याज दिला जाईल. 75 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के व्याज दिले जाईल. त्याच बरोबर 75 ते 120 महिन्यांच्या एफडीवर 6 टक्के व्याज मिळेल. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.ujjivansfb.in/support-interst-rates
हे पण वाचा :
Kotak Mahindra Bank च्या एफडीवरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा
EPFO कडून PF पैकी किती रक्कम शेअर्समध्ये गुंतवली जाते ??? ते जाणून घ्या !!!
FD Rates : श्रीराम सिटी युनियनने आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Multibagger Stock : गेल्या 21 वर्षात ‘या’ शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांनी मिळवले कोट्यवधी रुपये !!!