व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने एफडीचे दर वाढवले, ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याज मिळवण्याची संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, Shivalik Small Finance Bank ने फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. या बँकेने बचत आणि एफडीवरील दर वाढवले ​​आहेत. Shivalik Small Finance Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता बँकेच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.00 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के व्याज दर मिळेल. Bank FD

Shivalik Small Finance Bank, first cooperative lender to get SFB licence,  starts operations

Shivalik Small Finance Bank च्या एफडीचे दर

आता Shivalik Small Finance Bank च्या 7 ते 14 दिवसांच्या FD वर 3.75%, 15 ते 29 दिवसांच्या FD वर 4.00%, 30 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के, 91 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 5.00 टक्के, 6 महिने ते 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75%, 12 ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.50%, 18 महिने ते 36 महिन्यांच्या FD वर जास्तीत जास्त 8.00% व्याज दर मिळेल. Bank FD

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://shivalikbank.com/deposits/fixed-deposits.php

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये