औरंगाबाद | कोविड -19 च्या दुसर्या लहर मुळे बंद पडल्यानंतर मंगळवारी 8 जून रोजी स्मार्ट सिटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. यापूर्वी कोविडच्या केसेस मध्ये वाढ आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे बससेवा थांबवावी लागली होती. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी दिलेल्या सूचनाानुसार प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेस टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील.
पहिल्या टप्यात सिडको ते रेल्वे स्टेशन मार्गे – टीव्ही सेंटर, औरंगपुरा ते रांजणगाव मार्गे – मध्यवर्ती बस स्थानक, औरंगपुरा ते छत्रपती शिवाजी नगर मार्गे – महावीर चौक, सेव्हन हिल, सिडको ते घाणेगाव मार्गे – रांजणगाव, मायलन, सिडको ते जोगेश्वरी मार्गे – रांजणगाव या पाच मार्गांवर २४१ फेऱ्यामार्फत १६ बसेस बससेवा देतील.
पहाटे पाचपासून बसेस सुरू झाल्या. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) च्या बसविभागाच्या कर्मचाऱ्यांचा उपस्थितीत औपचारिक उद्घाटनासाठी सिडको बस स्टँड येथे एक छोटासा समारंभ आयोजित करण्यात आला होता.मुख्य चालन व्यवस्थापक राम पौनीकर,उपव्यावस्थपक सिद्धार्थ बनसोड आणि ललित ओस्तवाल आणि लाईन चेकिंग ऑफिसर बस रीलाँचच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.