एकाच कंत्राटदाराकडे स्मार्ट सिटीच्या 317 कोटींच्या रस्त्यांची कामे

औरंगाबाद – स्मार्ट सिटी प्रशासनामार्फत 317 कोटी रुपयांतून करण्यात येणारी रस्त्यांची सर्व कामे एकाच कंत्राटदाराने मिळवली. यामुळे राजकीय मंडळींसह कंत्राटदारांना मध्ये खळबळ उडाली आहे. 11 ते 15 टक्के कमी दराने निविदा आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी फक्त नऊ महिन्यांचा अवधी असून निर्धारित वेळेत एकाच कंत्राटदाराकडून 108 रस्त्यांची कामे पूर्ण होतील का, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

स्मार्ट सिटी नाही या कामांसाठी तीन निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. दोन निविदांतील कामांसाठी प्रत्येकी तीन तर तिसर्‍या निवेदनासाठी चार कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. 11 ते 15 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी एकाच कंत्राटदाराने दर्शवली होती.

31 मार्च च्या तारखेनुसार वर ऑर्डरी तयार आहेत. मात्र ते संबंधित कंत्राटदाराला अद्याप दिलेले नाहीत.