Smart Meter | एप्रिलपासून बसणार स्मार्ट मीटर, विजेसाठी मोबाइलप्रमाणे करावा लागणार रिचार्ज

0
1
Smart Meter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Smart Meter | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक गोष्टीचा खर्च देखील वाढलेला आहे. अगदी आजकाल लाईटबिल देखील जास्त येते. त्यामुळे ग्राहक नेहमीच त्रस्त असतात. परंतु आता या वीज बिलातून तुम्हाला कायमची सुटका मिळणार आहे. कारण आता एप्रिलपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवणार आहेत. या अनुषंगाने महावितरणाची काम देखील चालू झालेले आहे. एप्रिलमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 6 लाख 19 हजार स्मार्ट मीटर बसवणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिलेली आहे.

त्यामुळे महावितरण प्रशासनाकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर (Smart Meter) बसवण्याची कामे सुरू झालेली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सूचना दिलेल्या आहे. ग्राहकांना विजेच्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी नियंत्रण आणण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचे महावितरणाने काम सुरू केलेले आहे. हा स्मार्ट मीटर बसवल्यावर लोकांना मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे. त्यामुळे आपल्याला महिन्याभरात किती वीज वापरायची आहे. हे आधीच निश्चित करता येणार आहे. त्यानुसार तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात हे स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती महावितरण प्रशासनाने दिलेली आहे.

स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये | Smart Meter

  • जिल्हातील सर्व वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येणार आहे.
  • त्यांना पाहिजे तेवढी आवश्यक रक्कम भरून वीज वापरता येणार आहे.
  • वीज किती वापरायची किती वीज वापरायची याचे नियोजन ग्राहकांना करणे शक्य होणार आहे.
  • यामुळे अनावश्यक विजेचा वापर टाळून आर्थिक बचत देखील करता येणार आहे.
  • ग्राहकांना घरबसल्या मोबाईलप्रमाणे रिचार्ज करून वीज वापरता येणार आहे.
  • रिचार्ज केलेल्या रकमेतून रोज किती वीज वापरावी किती शिल्लक आहे किती संपत आल्याची माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळणार आहे.
  • तुमच्या रिचार्ज जर सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत संपला तरी तुमचा वीज पुरवठा सुरू राहणार आहे. परंतु ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रिचार्ज करणे गरजेचे आहे.