SmilePay : फक्त एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश किंवा कार्डची झंझट संपली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जगात तंत्रज्ञान इतके पुढे गेलं आहे कि, आपण आजकाल खिशात पैसे घेऊन न फिरता एटीएम कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करतो. परंतु तुम्हाला जर कोणी म्हंटल कि आता फक्त एका स्माईलने (SmilePay) तुमचं पेमेंट होईल तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. फेडरल बँकेने स्माईल पे लाँच केले आहे, या पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून ग्राहक फक्त आपण चेहरा दाखवून आणि स्माईल करू पेमेंट करू शकतात. त्यामुळे एटीएम कार्ड किंवा पैसे घेऊन कुठे जाण्याची गरज नाही.

फेडरल बँकेने 29 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, SmilePay हे भारतातील पहिल्या प्रकारचे पेमेंट सोल्यूशन आहे जे UIDAI च्या BHIM आधार पे वर तयार केलेले प्रगत फेशियल ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान वापरते. SmilePay ग्राहकांना फक्त त्यांचा चेहरा स्कॅन करून पेमेंट करण्यास सक्षम करते. ग्राहकांना पेमेंट करताना अधिक सोप्प आणि सुलभ व्हावं यासाठी बँकेने हि नवीन सिस्टीम आणली आहे. ग्राहक एकूण २ टप्यात सर्व प्रोसेस करू शकतात. याबाबत फेडरल बँक सीडीओ इंद्रनील पंडित यांनी म्हंटल कि, “कॅशपासून कार्ड, क्यूआर कोड, वेअरेबल आणि आता फक्त हसत हसत पैसे देण्याची संकल्पना यामुळे ग्राहकांना एक रोमांचक अनुभव येईल.

SmilePay चे फायदे काय? SmilePay

स्माइल पेच्या माध्यमातून तुम्ही कॅश, कार्ड किंवा मोबाईल डिवाइस नसतानाही पैशांचा व्यवहार पूर्ण करु शकता.
यामुळे पेमेंट करणं अतिशय सोप्प होणार आहे तसेच काउंटर वरील गर्दीपासून सुटका होईल.
हि नवी सिस्टीम सुरक्षित UIDAI फेस ऑथेंटिकेशन सेवेद्वारे समर्थित असल्याने सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवहार करता येणार आहे.

मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ‘स्माइलपे’ सुरुवातीला फक्त फेडरल बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल, यासाठी सदर व्यापारी आणि ग्राहक दोघांचे सुद्धा फेडरल बँकेत खाते असणे आवश्यक आहे. फेडरल बँक आपल्या सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

स्माईल पे वरून कसं पेमेंट होईल?

ग्राहक आणि दुकानदार या दोघांच्याही मोबाईलमध्ये फेड मर्चंट अॅप असणं आवश्यक आहे.
तुम्हाला बिलिंग करायचे असेल तर चेकआऊट करताना स्माइल पेचा पर्याय निवडा. दुकानदार कॅमरावरून ग्राहकाचा चेहरा स्कॅन करेल आणि यूआयडीएआय सिस्टिमच्या आधारे रिकग्नेशन डेटाशी जोडेल. चेहऱ्याची ओळख पटताच तुमच्या बँक खात्यातून पेमेंट ऑटोमॅटिक केले जाईल .

किती रुपयांची मर्यादा?

आधार-सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) आणि BHIM आधार पे सेवांसाठी मानक मर्यादा एकत्रितपणे 5,000 रुपये प्रति व्यवहार आहे तसेच ग्राहक दर महिन्याला 50,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतील.