Smoke Paan Side Effects | स्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटाला पडले छिद्र; डॉक्टरांनी कापला पोटाचा भाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Smoke Paan Side Effects | आज-काल बाजारामध्ये अनेक नवनवीन पदार्थ विकायला आलेले आहेत. याला टेस्टी फुड्स असे म्हणतात. लग्न समारंभ असो किंवा इतर कुठल्याही समारंभात लोक त्यांच्या जेवनामध्ये असे वेगवेगळे पदार्थ खातात. हे पदार्थ दिसायलाही आकर्षक दिसतात आणि चवीलाही चांगले असतात. परंतु कधीकधी हेच चांगले चव देणारे पदार्थ आपला जीव धोक्यात आणतात. अशीच एक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे बेंगळुरू शहरातील एका बारा वर्षाच्या मुलीची प्रकृती नायट्रोजन पान खाल्ल्यानंतर बिघडलेली आहे. या मुलीने नायट्रोजन पान खाल्ल्याने तिच्या पोटात छिद्र पडले आहे. त्यानंतर तिला इतका त्रास वाढला की डॉक्टरांना मुलीच्या पोटाचा मोठा भाग कापावा लागला.

लिक्वीड नायट्रोजन आरोग्यासाठी घातक | Smoke Paan Side Effects

आरोग्य तज्ञांच्या मते, लिक्विड नायट्रोजन आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. द्रव्य स्वरूपात नायट्रोजन शरीरात केल्याने मोठ्या नुकसान होऊ शकते. आज काल लग्न समारंभात लिक्विड नायट्रोजनचा वापर मोठ्या प्रमाणात अनेक पदार्थांमध्ये केला जातो. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असते.

लिक्विड नाइट्रोजन खाल्ल्यामुळे कोणते नुकसान होते

  • लिक्विड नायट्रोजन खाल्ल्याने चक्कर येऊ शकते.
  • यामुळे उलट्या होण्याच्या तक्रारी वाढतात.
  • तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
  • गंभीर परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
  • अत्यंत कमी तापमानावर हे खाल्याने श्वासोच्छ्वास अचानक बंद होतो.