हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Smoking Effects) नाक्यावर ऐटीत उभं राहून फु फु करत सिगारेटचा धूर काढणे आजकाल सामान्य बाब झाली आहे. ज्याला त्याला ही गोष्ट अगदी स्टाईल वाटू लागली आहे आणि त्यामुळे तरुणाईलासुद्धा सिगारेटच्या धुराचं आकर्षण वाटू लागलं आहे. आज स्मोकर्सची संख्या पाहता कालांतराने जगभरात केवळ सिगारेटचा शूर दिसायला फार वेळ लागेल असे वाटत नाही. सिगारेट पिणे आणि धूर काढून शायनिंग मारणे आरोग्याच्या दृष्टीने किती आणि कसे हानिकारक आहे? याकडे मात्र कुणाचाच लक्ष नाही.
सिगारेट पिणाऱ्यांना जितका त्रास होतो तितकाच त्रास त्यांच्या आसपास असणाऱ्यांना देखील होतो याचा त्यांना अंदाज देखील नाही. आजकाल बरेच लोक स्मोकिंगच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. (Smoking Effects) या लोकांच्या हृदयावर आणि फुफ्फुसांवर स्मोकिंगचा गंभीर परिणाम होतोच. शिवाय यांच्यासह इतरांच्या डोळ्यांवर सिगारेटच्या धुराचा गंभीर परिणाम होऊन दृष्टी जाण्याची शक्यता असते. सिगारेटचा धूर नजरेसाठी कसा हानिकारक ठरतो? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मॅक्युलर डिजनरेशनचा धोका (Smoking Effects)
स्मोकिंगच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमध्ये मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ही समस्या दीर्घकाळ स्मोकिंग करणाऱ्यांना उतार वयात जाणवू शकते. वृद्धापकाळात दृष्टी कमजोर होण्याचे हे एक मुख्य कारण असल्याचे तज्ञ सांगतात. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हा एक विकार असून यामुळे नजर कमी होत जाते आणि कालांतराने माणूस दृष्टिहीन होऊ शकतो.
मोतीबिंदूची समस्या
तंबाखूचे अतिसेवन केल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका असतो. यात डोळ्याच्या बुब्बुळांवर ढगाळ थर जमा होतो. स्मोकिंग करणाऱ्यांना मोतीबिंदू होण्याची शक्यता इतर लोकांपेक्षा जास्त असते. (Smoking Effects) कारण स्मोकिंग करतेवेळी सिगारेटचा शूर डोळ्यांचे नुकसान करत असतो. ज्यामुळे मोतीबिंदू होऊन दृष्टी अस्पष्ट होते. कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी कमी झाल्याने कमी प्रकाशात वस्तू दिसत नाहीत.
डोळ्यांचे आजार
अति स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींमध्ये डोळ्यांचे विविध आजार होण्याची सर्वाधिक शक्यता असते. सिगारेटचा धूर डोळ्यांच्या आतील दृष्टीपटल खराब करतात. ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित विविध समस्या होऊ शकतात. या आजरांमुळे माणूस दृष्टिहीन होऊन कायमचे आंधळेपण येऊ शकते. (Smoking Effects)
ड्राय आय सिंड्रोमचे बळी
स्मोकिंग करणारी व्यक्ती स्वतःसोबत इतरांच्या देखील आरोग्याचे नुकसान करत असते. सिगारेटचा धूर स्मोकरसोबत त्याच्या आसपास वावरणाऱ्या लोकांसाठी श्वासाच्या समस्या निर्माण करून फुफ्फुसाचे आरोग्य खराब करू शकतो. इतकेच नव्हे तर या धुरामुळे ड्राय आय सिंड्रोमचा धोका वाढतो. यात ऑप्टिक नर्व्हचे गंभीर नुकसान होते. (Smoking Effects) ही समस्या सर्वाधिक लहान मुलांमध्ये दिसून येते. सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आल्यास लहान मुलांना मायोपिया आणि नंतरच्या आयुष्यात दृष्टीशी संबंधित समस्या होण्याचा धोका असतो.