स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींचे कौतुक; राजकीय चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या कट्टर विरोधक आणि एकेकाळी थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) याना होमपीच असलेल्या अमेठीमधून पराभूत करणाऱ्या भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आता चक्क त्याच राहुल गांधींचे कौतुक केलं आहे. आता राहुल गांधींचे राजकारण बदलले आहे. सध्या राहुल गांधी हे वेगळे राजकारण करत आहेत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो ही गोष्ट वेगळी असं स्मृती इराणी यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितलं. स्मृती इराणी यांनी पत्रकारांच्या पॉडकास्ट टॉप अँगल या कार्यक्रमात विविध विषयांवर थेट भाष्य केलं.

स्मृती इराणी म्हणाल्या, राहुल गांधी जातीच्या राजकारणातही ते अत्यंत जपून बोलत आहेत. राहुल यांनी संसदेत टी-शर्ट घातला तर तरुण पिढीला काय संदेश जाईल हे त्यांना माहीत आहे. यासोबतच त्यांनी भाजपला सावध करत राहुल यांनी उचललेले कोणतेही पाऊल चांगले, वाईट किंवा बालिश आहे, अशा गैरसमजात राहू नये, पण आता ते वेगळे राजकारण करत आहेत असं म्हंटल. स्मृती इराणी यांनी एकप्रकारे राहुल गांधी यांचे कौतुक केलं आहे. कट्टर विरोधक असलेल्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केल्यांमुळे राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. सातत्याने गांधी कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्या म्हणून देशभरात त्यांची ओळख आहे. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अमेठीच्या जनतेने स्मृती इराणी याना नाकारलं. भलेही याठिकाणी राहुल गांधी पुन्हा निवडणुकीला उभे राहिले नाहीत मात्र काँग्रेस खासदार किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव करत 2019 मधील राहुल गांधींच्या पराभवाचा वचपा काढला.