किमती दगडांची औरंगाबादेतून विदेशात तस्करी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 औरंगाबाद  | शहरातून मुंबई मार्गे चीनसह विदेशात मौल्यवान दगडाची तस्करी करणारे रॅकेट समोर आले आहे. याप्रकरणी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी अतुल दौड ,अप्पर तहसीलदार निखिल धुरंधर यांच्या पथकाने एमजीएम आणि हरसुल परिसरातून 15 ब्रास किमती दगड जप्त केले आहेत . दरम्यान, याप्रकरणी आश्रम मोतीवाला आणि तराब मोतीवाला यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे. औरंगाबाद, जळगाव, बीड जिल्ह्यातून भूगर्भातून काढण्यात येणार्‍या मौल्यवान दगड मुंबईमार्गे चिन्ह विदेशात आणि गुजरातमध्ये तस्करी करण्यात येत असल्याची माहिती असल्याची तक्रार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती.

त्यानुसारच जिल्हाधिकार्‍यांनी खनिकर्म अधिकारी अतुल दौड अप्पर तहसीलदार निखील धूळ दर नायब तहसीलदार रेवनाथ ताठे, गौण खनिज शाखेतील अव्वल कारकून सतीश पेंडसे यांच्या पथकाने एमजीएम समोरील मोतीवाला यांच्या निवासस्थानाला लगत आणि हर्सूल परिसरात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तेथे 15 ब्रास दगड असल्याचे निदर्शनास आले. या पथकाने हे दगड जप्त केले.

Leave a Comment