अहमदनगर प्रतिनिधी | जिल्हा रुग्णालयात झोपलेल्या एका पेशंटच्या नातेवाईकाच्या शर्टात चक्क साप घुसला मात्र वेळीच ही गोष्ट रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि आकाश जाधव या सर्पमित्राला पाचारण करण्यात आले.
ज्यांच्या शर्टात साप घुसला होता तो रुग्णाचा नातेवाईक मात्र गाढ झोपेत होता. सर्पमित्र जाधव यांनी येताच साप कोणत्या जातीचा आहे, विषारी आहे की बिनविषारी आहे याचे निरीक्षण केले. सुदैवाने हा साप बिनविषारी गवत्या साप म्हणून ओळखला जाणारा असल्याने त्यांनी सर्वांना धीर आला.
आणि शर्टात हात घालून लीलया सापाला पकडले. तोवर निद्रिस्त असलेले रुग्णाचे नातेवाईक गाढ झोपलेलेच होते. साप पकडल्या नंतर त्यांना उठवण्यात आले. पकडलेला साप हा बिनविषारी होता, साप जो पर्यंत स्वतःला सुरक्षित समजतो तोवर कुणालाही दंश करत नाही. अशी माहिती सर्पमित्र आकाश जाधव यांनी यावेळी दिली.