अम्फान वादळाचा पश्चिम बंगालला जबरदस्त तडाखा; आतापर्यंत ७२ जणांच्या मृत्यूची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । बुधवारी पश्चिम बंगालला धडकलेल्या अम्फान चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा पश्चिम बंगाल राज्याला बसला आहे. राज्यात अम्फान चक्रीवदाळामुळे आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यूची नोंद झाल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.

अम्फान या चक्रीवादळाला कोरोना विषाणूपेक्षाही भयानक असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आतापर्यंत इतकं भयानक चक्रीवादळ मी कधीही पाहिलं नव्हते, असेही त्या म्हणाल्या. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाडे पडल्यामुळे झाला आहे. ओडिशामध्येही तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात बचाव कार्य सुरु आहे. तसेच बांगलादेशमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. पश्चिम बंगालमधील दिघा येथे वादळाने भरतीच्या मोठ्या लाटा आल्या. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपारा, जाजपूर, गंजम, भद्रक, बालासोर येथे मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला, त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळले आहेत.

सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवले असून वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाला. पश्चिम बंगालमध्ये उद्या दुपापर्यंत वाऱ्याचा वेग कायम राहणार आहे. अम्फान वादळाचा फटका नंतर आसाम व मेघालयालाही बसू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment