औरंगाबाद : शहरात संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना चाचण्या थांबलेल्या नाहीत. दररोज दीड ते दोन हजार जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. तर मागील सव्वा वर्षात तब्बल 8 लाख 93 हजार इतक्या विक्रमी चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये तब्ब्ल 5 लाख 19 हजार इतक्या अँटीजेन चाचण्या समावेश आहे.
शहरात मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणू संसर्गाची साथ सुरू झाली. आता सव्वा वर्षानंतर कोरोना काही अंशी नियंत्रणात आला आहे. शहरात केवळ 10 ते 15 नवीन रुग्ण आढलत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोरोना चाचण्या सुरूच ठेवण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा उद्रेक झाला. यावेळी शहरात दररोज 5 ते 6 हजार चाचण्या होत होत्या. आता ही संख्या कमी झाली आहे. मात्र अजुनीही रोज दीड ते दोन हजार इतक्या चाचण्या केल्या जात आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म्याहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. मार्च 2020 पासून जुलै 2021 पर्यंत शहरात तब्बल 8 लाख 93 हजार चाचण्या झाल्या आहेत. यात आरटीपीसीआर पद्धतीच्या 3 लाख 74 हजार आणि 5 लाख 19 हजार अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे.