म्हणुन त्यांनी थेट दुचाकी अन् गॅस सिलेंडरलाच दिला गळफास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | पेट्रोल आणि गॅसची दररोज होत असणारी दरवाढ आणि त्यामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल याचा निषेध करण्यासाठी सांगलीत मदानभाऊ युवा मंचच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या महागाईला कंटाळून “मी गॅस सिलेंडर आणि माझी सहकारी दुचाकी आत्महत्या करत आहे” या मथळ्या खाली चिट्ठी लिहून दुचाकी अंडी सिलेंडरला गळफास देत प्रतिकात्म आंदोलन करण्यात आले.

या महागाईच्या काळात दुखवटा म्हणून बारा, तेरा दिवस साजरा म्हणून शिरा, भात, आमटी, माजी चे जेवन ही यावेळी करण्यात आलं. सांगलीतील काँग्रेस भवनच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची शहरात मोठी चर्चा होती. महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा येणा-या काळात रास्ता रोको सारखे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात उपमहापौर, काँग्रेसचे नगरसेवक यांच्यासह मदनभाऊ युवा मंचाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment