खरंच… डोमिनिका फरार मेहुल चोकसीला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे का? अँटिगाच्या पंतप्रधानांनी काय म्हटले ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय बँकेकडून कर्जाच्या फसवणूकीच्या प्रकरणात असलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी आपले परदेशी नागरिकत्व वाचवण्यासाठी न्यायालयाचा आश्रय घेत आहे. अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी बुधवारी वृत्तसंस्था ANI ला ही माहिती दिली. ते म्हणाले, “कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या तपासणी करीता फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीने अधिकाऱ्यांकडे स्वत:ला सोपवण्याऐवजी आपले नागरिकत्व वाचविण्यासाठी न्यायालयाचा वापर करत आहेत.”

यासह अँटिगाच्या पंतप्रधानांनी सांगितले की,”मेहुल चोकसी यांनी आपला वकील बदलला आहे.” ते पुढे म्हणाले की,” चोकसी यांनी जुन्या वकिलाची जागा नवीन वकिल जस्टीन सायमन यांच्याकडे आपली केस दाखल केली आहे. ते विरोधी पक्ष यूपीपीचे सदस्य आणि माजी एटर्नी जनरल होते. एवढेच नव्हे तर सायमनने चोकसी यांनाही असे आश्वासन दिले आहे की,” आपल्या प्रचाराच्या फंडिंगसाठी आपण त्याचे रक्षण करू. हेच कारण आहे की, त्यांना चोकसी यांना भारत नव्हे तर अँटिगा येथे पाठवायचे आहे जेणेकरून ते तेथे घटनात्मक सुरक्षेच्या आश्रयाने लपू शकतील.”

अँटिगाच्या पंतप्रधानांनीही आपला मुद्दा पुन्हा सांगितला ज्यामध्ये त्यांनी डोमिनिकाला चोकसीला थेट भारतात हस्तांतरित करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले, ‘माझं प्रशासन अजूनही त्या विनंतीवर आधारीत आहे ज्यात डोमिनिकाला मेहुल चोकसी याला थेट भारतात प्रत्यार्पित करण्यास सांगितले गेले कारण तो अजूनही तेथील नागरिक आहे.”

मेहुल चोकसी सध्या डोमिनिका येथील तुरूंगात बंद आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी, चोकसी अँटिगा आणि बर्म्युडा येथून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाला होता आणि इंटरपोलने त्याच्याविरूद्ध ‘यलो नोटीस’ जरी केल्यामुळे शेजारच्या डोमिनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली. आता भारत सरकार त्याचे प्रत्यर्पण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे चोकसीने असा आरोप केला आहे की,” अँटिगा आणि भारतीय दिसणार्‍या पोलिसांनी अँटिगा आणि बर्म्युडा येथील जॉली बंदरातून त्याचे अपहरण केले आणि त्याला डोमिनिका येथे नेले. डोमिनिकामधून चोकसीचे एक छायाचित्र समोर आले आहे ज्यामध्ये त्याचे डोळे सुजले होते आणि त्याच्या हातावर स्क्रॅचच्या खुणा होत्या.

अँटिगा ने डोमिनिकाला चोकसीला थेट भारतात सोपवायला सांगितले
डोमिनिकामध्ये अटक झाल्यानंतर अँटिगा आणि बार्मुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन म्हणाले की,” त्यांनी डोमिनिकाला या हिरे व्यावसायिकाला थेट भारताकडे देण्यास सांगितले होते.” 25 मे रोजी रात्री डोमिनिकामध्ये चोकसीच्या अटकेच्या बातमीनंतर ब्राऊन यांनी माध्यमांना सांगितले की,”त्यांनी चोक्सीला भारतात पाठविण्याबाबत डोमिनिका प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.” अँटिगा न्यूजने ब्राऊनचे म्हणणे उद्धृत केले की,”आम्ही त्यांना (डोमिनिका) चोकसीला अँटिगामध्ये न पाठविण्यास सांगितले आहे. त्याला पुन्हा भारतात पाठविणे आवश्यक आहे जेथे त्याला फौजदारी आरोपांचा सामना करावा लागू शकतो.”

संपूर्ण प्रकरण काय आहे
चोकसी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेची 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केली. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात बंद आहेत आणि भारत त्याच्या प्रत्यार्पणाच्या विरोधात खटला चालवित आहेत. चोकसीने 2017 मध्ये अँटिगा आणि बर्म्युडाचे नागरिकत्व घेतले आणि जानेवारी 2018 च्या पहिल्या आठवड्यात तो भारत सोडून पळाला. यानंतरच हा घोटाळा समोर आला. दोघेही आता सीबीआय चौकशीला सामोरे जात आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment