Thursday, March 30, 2023

पुरवणी परीक्षा: औरंगाबाद विभागात दहावी-बारावीचे ‘इतके’ विद्यार्थी उत्तीर्ण

- Advertisement -

औरंगाबाद – दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना निकालांवर आक्षेप होता त्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून फेर परीक्षा घेण्यात आली होती. यात औरंगाबाद विभागातून दहावीत 31.64 टक्के तर बारावीत 36 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 607 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून मात्र 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच जुन्या अभ्यासक्रमासाठी 933 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 899 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 358 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीत 2064 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 1520 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि यातून 481 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करण्यास 21 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील‌. तसेच उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती साठी 21 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.