…तर राज्यात जाणाऱ्या हजारो बळीस राज्य सरकार जबाबदार असेल; विद्यार्थ्यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | राज्यात एमपीएससीच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. हजारो विद्यार्थी जागा कधी निघतील याची वाट पाहत आहेत. अभ्यास पूर्ण आहे घरच्यांकडून आता अपेक्षाही वाढलेल्या आहेत. मात्र परीक्षा होत नसल्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. राज्य सरकारने जर लवकरात लवकर रिक्त जागा भरण्याची घोषणा केली नाही तर राज्यात जाणारे हजारो बळी यास राज्यसरकार जबाबदार असेल. असा संतप्त इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

राज्यात नोकर भरतीकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे लावणारे वेळापत्रक, महापरीक्षा पोर्टल वरील गैरप्रकार यामुळे तरुणांमध्ये संताप आहे. अनेकांनी परीक्षा उत्तीर्ण होऊनही आत्महत्या केल्या आहेत. नुकतेच स्वप्नील लोणकर प्रकरण राज्यात घडले. त्यानंतर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. राज्य सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र अजूनही या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. पदभरती अजूनही सुरू झालेली नाही.

याबाबत शनिवारी दिवसभरात विद्यार्थ्यांनी ‘डिक्लेअर एमपीएससी एक्झाम’ असा हॅशटॅग तर सोशल मिडीयावरुन अनेक विद्यार्थी टीका करताना दिसून आले. राज्यभरातून या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर एमपीएससी भरतीसाठी रिक्त जागा भरा, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मात्र अजूनही त्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आलेले नाही अशा विद्यार्थ्यांची प्राधान्याने नियुक्ती करा. अशा अनेक मागण्या विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment