हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पाच जिल्ह्यातील पोट निवडणुकीवरून भाजप व ओबीसी समाजातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पोट निवडणुकीच्या निर्णयामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे या आक्रमक झाल्या आहेत. “अगोदरच ओबीसी समाजातील आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही आणि त्यात आता पोट निवडणूक घेऊन राज्य सरकार ओबीसी वर्गावर अन्याय करीत आहे. जर या सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही आणि निवडणूक रद्द केल्या नाहीत तर न्यायालयात जाऊ, मग न्यायालयाच्या आदेशानंतर या सरकारला निवडणूक रद्द कराव्या लागतील,” असे मुंडे यांनी म्हंटल आहे.
ओबीसी वर्गाच्या आरक्षणाचा प्रश्न सध्या महत्वाचा बनला असून याबाबत भाजपकडून चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पोट निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबाबत आज भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत या पोट निवडणूक रद्द कराव्यात. आणि अगोदर ओबीसींचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय या निवडणूक घेणे म्हणजे या समाजातील लोकांसाठी धक्क्कादायकच आहे. या निर्णयाबद्दल आपण न्यायालयातही जाणार आहोत. तसेच राज्य सरकारने जर या निवडणूक रद्द केल्या नाहीत तर न्यायालयातही दादा मागू.
वास्तविक पाहता या सरकारकडे ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटाच उपलब्ध नाही. त्यामुळे हे राज्य सरकार आरक्षण देण्यामध्ये दिरंगाई करीत आहे. आपली जबाबदारी टाळत आहे. या राज्य सरकारकडून इम्पिरिकल डाता मिळवण्यासाठी एका विशेष प्रकारचे कृती दल स्थापन करण्याची गरज आहे. त्यानंतर या सरकारकडून डाटा मिळू शकेल, असेही मुंडे यांनी म्हंटले आहे.