कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपालिकेत विविध कंपन्यांचे बोगस लेटर पॅड वापरून त्याद्वारे काम मिळवण्यासाठी बोगस ठेकेदार प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. या बोगस ठेकेदारांनी ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड आणि जेपी कंट्रक्शन या कंपन्यांचे बोगस लेटर बनवून कराड पालिकेकडे ते दाखल केलेले आहेत. तसेच संबंधित ठेकेदार लेटरपॅडद्वारे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संबंधित बोगस लेटरपॅड वापरणाऱ्या बोगस ठेकेदारांची सखोल चौकशी करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी कराडमधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
कराड पालिकेत बोगस लेटरपॅड घोटाळा उघडकीस आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, संजय चव्हाण, शिवसेना नेते राजेंद्र माने यांनी नुकतीच शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रमोद पाटील म्हणाले की, ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड यांनी नुकतेच नगरपालिकेस एक पत्र दिले आहे आणि त्यामध्ये कंपनीने असे म्हंटले आहे कि कराड शहरातील रस्त्याच्या कामाचे टेंडर मागण्यासाठी आमच्या कंपनीचे बोगस लेटर पॅड वापरण्यात आले आहे. संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी.
यावेळी संजय चव्हाण म्हणाले की, कराडमधील काही ठेकेदारांकडून पालिका प्रशासनावर दबाव आणून अटी व शर्ती शिथिल करण्याबाबत प्रयत्न चालू आहेत. दर्जेदार कामे पाहिजे असतील तर महाराष्ट्र शासनाने ज्या अत्याधुनिक मशिनरी वापरण्याच्या अति घातलेल्या आहेत. त्या जर असतील तर रस्ते मजबूत आणि दर्जेदार होतील. आणि शासनाला त्या त्या रस्त्यांवर वारंवार कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार नाहीत. यापूर्वी जे पालिकेकडून जे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. ते दोन ते तीन महिन्यातच खराब झालेले आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=913135079806345&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=1YhcI9R&ref=sharing
यावेळी राजेंद्र माने म्हणाले की, नुकतेच ऑनलाईनपद्धतीने कामांचे टेंडर निघालेले आहेत. यावेळी काही ठेकेदारांनी पार्क्स सांगितले कि यामधील अति कमी कराव्यात म्हणजे आम्हाला संबंधित टेंडर भरता येईल. हि पूर्णपणे चुकीची पद्धत असून शासनाने जे जे निर्बंध घातलेले आहेत त्या पद्धतीने चांगल्या प्रकारचे ठेकेदार त्यात यावेत आणि त्यांच्याकडून चांगल्या व उत्तम दर्जाचे रस्ते व्हावेत अशी कराड शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत.