Wednesday, March 29, 2023

हत्तींनी अशा प्रकारे खेळला फुटबॉल ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. आणि हा हत्तींचा व्हिडीओ आहे. हत्तीचा फुटबॉल खेळतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या हत्तींच खूप कौतुक वाटेल.या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन हत्ती फुटबॉल खेळत आहेत. एक हत्ती आपल्या सोंडेनं फुटबॉल खेळत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याची स्टाइल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

व्हिडीओमध्ये पाहिलेले दोन्ही हत्ती लहान आहेत. जेव्हा तो मैदानात फुटबॉल खेळायला उतरला तेव्हा त्याने एकमेकांकडून फुटबॉल हिसकावून घेण्याचा खूप प्रयत्न करतात. दुसर हत्ती आपल्या सोंडेत फुटबॉल लपवून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ 28 डिसेंबर रोजी ट्वीट केला होता. आतापर्यंत हा व्हिडीओ 3400 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी हे दोन भाऊ खूप मस्त खेळत असल्याच्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’